Take a fresh look at your lifestyle.

पवारांच्या राष्ट्रवादीला झटका; पहा सीबीआयने देशमुखांवर गुन्हा दाखल करून कशी केलीय कार्यवाही सुरू

पुणे :

Advertisement

वसुलीच्या आरोपामुळे खुर्ची गमावलेल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एफआयआर नोंदविला आहे. तसेच त्यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरादप पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा झटका बसला आहे. देशमुख यांची यापूर्वीही सीबीआयने चौकशी केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांची खुर्ची गेली आहे. सीबीआयने हायकोर्टाच्या आदेशावरून त्यांच्याविरूद्ध चौकशी सुरू केली आहे.

Advertisement

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान सीबीआयकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार देशमुख आणि अन्य अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यासाठी पुरेशी प्राथमिक सामग्री मिळाली. गुन्हा नोंदवल्यानंतर सीबीआयने मुंबईतील अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि अन्य अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंट्समधून १०० कोटी रुपये वसूल करण्यास देशमुखांनी सांगितले होते, असा आरोप आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांविषयी भ्रष्टाचाराच्या प्रकाराबद्दल तक्रार केल्यावर बदली झाल्याचा आरोप करत परमबीर सिंग यांनी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले. मात्र, सिंग यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडण्यासंदर्भात वाझे याला निलंबित करण्यात आलेले आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply