Take a fresh look at your lifestyle.

म्हणून बरे झाल्यावरही असतोय 65 टक्के धोका; पहा नेमके काय आहे मृत्यूचे कारण

पुणे :

Advertisement

कोरोना विषाणूबाधा झाल्यावर काळजी घेऊन त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांना पुढील सहा महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका जास्तच असतो. यामध्ये असेही रुग्ण असू शकतात ज्यांना संसर्ग झाल्यावर रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली नव्हती. म्हणजेच कोरोनामधून बरे झाल्यानंतरही मृत्यूचा धोका थांबत नाही. तब्बल 65 टक्के लोकांना याचा धोका असतो. त्यामुळे बरे झाल्यावरही काळजी घ्या.

Advertisement

कोविड 19 च्या आतापर्यंतच्या सर्वसमावेशक अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. गुरूवारी ‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात संशोधकांनी असे म्हटले आहे की, येत्या काही वर्षांत जगातील लोकसंख्या या आजाराने बरीच कमी होणार आहे. अभ्यासाचे ज्येष्ठ लेखक आणि सहाय्यक प्राध्यापक झियाद अल अली म्हणतात की, कोरोना विषाणूची बाधा झाल्यावर सहा महिन्यांच्या आत मृत्यूचा धोका अजिबात कमी होत नाही.

Advertisement

MyGovIndia on Twitter: “Remdesivir can have dangerous side effects if used in high dosages without consulting. Watch Dr. Naresh Gupta, Senior Medical Consultant, MAMC explain that why it is only meant to be given to patients admitted to hospital. #IndiaFightsCorona @MoHFW_India @PMOIndia @PIB_India https://t.co/OyQPIZVYHu” / Twitter

Advertisement

संशोधकांना असेही आढळले आहे की, संसर्ग झाल्यावर 30 दिवसानंतर कोरोनामधून बरे होणाऱ्या लोकांचा मृत्यू पुढील सहा महिन्यांपत सामान्य लोकांपेक्षा 60 टक्के जास्त होण्याचा धोका असतो. अमेरिकेच्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार विविध आजारांची यादी दिली गेली आहे. हा विषाणू बराच काळ शरीरात इतर समस्याही तरी करीत असतो. सुरुवातीला श्वसन रोगाशी संबंधित विषाणू म्हणून याला ओळखले गेले. मात्र, दीर्घकाळापर्यंत हा विषाणू जवळजवळ प्रत्येक अवयव प्रणालीवर दुष्परिणाम करू शकतो. 50 लाखाहून अधिक संक्रमित रुगांवर अभ्यास करून हे निष्कर्ष नोंदवले गेले आहेत. या दुष्परिणामांमध्ये श्वसन समस्या, हृदयामधील अनियमितता, मानसिक आरोग्याच्या समस्या आणि केस गळणे यांचाही समावेश आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply