Take a fresh look at your lifestyle.

आणि झाली तब्बल 400 % रुग्णवाढ; पहा डायमंड सिटीमध्ये किती वाढलीय करोनाची समस्या

मुंबई :

Advertisement

गुजरातची आर्थिक राजधानी आणि डायमंड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरतमध्ये गेल्या एक महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. इथे सध्या अनेकांना बेड मिळत नाहीत आणि ऑक्सिजनचीही मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. रुग्णांच्या कुटूंबावर उपचारासाठी रांगा लावण्याची वेळ आलेली आहे. कोविड समर्पित रुग्णालयांमध्ये दररोज 150 ते 200 मृत्यू होत आहेत. शहरातील सद्यस्थिती भयानक आहे.

Advertisement

या शहरात दोन महिन्यांपूर्वी असे नव्हते. मात्र, महापालिका निवडणूक झाल्या आणि चित्र पालटले. 23 फेब्रुवारी रोजी नगरसेवकांच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यावेळी रुग्णसंख्या स्थिर होती. त्या दिवसाची आणि आताची तुलना केल्यास सक्रिय रुग्णांमध्ये देखील 400 टक्क्यांनी वाढली आहे. अवघ्या दोन महिन्यांत सुरतची अवस्था बिकट झाली आहे. 24 फेब्रुवारीला सूरतमध्ये कोरोनाची केवळ 64 रुग्णसंख्या होती. मृत्यू नगण्य होते. तर केवळ 452 सक्रिय रुग्ण होते.

Advertisement

सध्या या शहरात जवळपास अडीच हजार रुग्ण सापडत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांवर पोहोचली आहे. निवडणूक प्रचार मोहिमेमध्ये सामाजिक अंतर आणि मास्क न घालता घाईघाईने मोहीम राबविली गेली. हजारोची गर्दी जमवून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे काढले. त्यावेळी सध्याच्या परिस्थितीबद्दल कुणालाही भान नव्हते. मग आता परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यावेळी सर्वांनी समाज सेवेच्या नावाखाली मास्क वापरायचे टाळले. याशिवाय लोकांनीही आपली जबाबदारी पार पाडली नाही. महापालिका प्रशासनानेही कोरोना कंट्रोलवर काम बंद केले होते. परिणामी आता ब्रिटन आणि आफ्रिका येथील घातक स्ट्रेन असलेला विषाणू या शहरात सक्रीय झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. सध्या येथील हिरे आणि कापडाची बाजारपेठ फ़क़्त 15-20 टक्के क्षमतेने चालू आहे.  

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply