Take a fresh look at your lifestyle.

मृत्यूचे प्रमाण वाढले; पाहा एलआयसीकडे किती दावे आलेत?

भारतात कोरोनाचे संकट आल्यापासून मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मृतांच्या आकड्याचे रोज नवनवे विक्रम समोर येत आहेत. सामान्य माणूस हवालदिल झाला आहे. आपल्यानंतर मागे राहणाऱ्या कुटुंबाचे काय होणार, ही चिंता प्रत्येकालाच असते. ‘असेन मी, नसेन मी’.. पण कुटुंबाचे हाल व्हायला नको, या भावनेने अनेक जण आपला विमा (Insurance) काढतात. त्यातही सर्वात सुरक्षित गुंतवणूक (Safe Investment) म्हणून आजही एलआयसीकडेच (LIC) पाहिले जाते.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण वाढले असून, मोठ्या प्रमाणात एलआयसीकडे भरपाईसाठी दावे आले आहेत. विशेष म्हणजे, या काळात माणसाला सर्वात असुरक्षित वाटत असल्याने विमा पॉलिसी काढण्याकडेही कल वाढल्याचे दिसत आहे.
एलआयसीने (Life Insurance Corporation of India) भारतीय आयुर्विमा महामंडळ) कोविड संकटात विक्रमी कामगिरी केली आहे. एलआयसीने गेल्या आर्थिक वर्षात तब्बल १.८४ लाख कोटी रुपयांचा नवीन प्रीमियम मिळवला. तर या वर्षात १.३४ लाख कोटी दावेपूर्तीसाठी खर्च केले आहेत.

Advertisement

विमा बाजारपेठेत वर्चस्व असणाऱ्या एलआयसीची कामगिरी गेल्या आर्थिक वर्षात चांगलीच खुलल्याचे दिसत आहे. या वर्षात एलआयसीच्या विमा योजना घेणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. विशेषतः मार्च महिन्यात एलआयसीचा विमा बाजारातील हिस्सा ८१ टक्क्यांवर गेला होता. संपूर्ण वर्षभरात एलआयसीचा हिस्सा ७४ टक्के राहीला.
सरत्या आर्थिक वर्षातही एलआयसीने पहिल्या वर्षातील प्रीमियम पोटी ५६ हजार ४०६ कोटी रूपये कमावले. तब्बल २ कोटी १० लाख पॉलिसींची विक्री केली. त्यापैकी ४६ लाख ७२ हजार पॉलिसी मार्च महिन्यातच विकल्या आहेत. मार्च-२०२०च्या तुलनेत त्यात २९८.९२ टक्के वाढ झाली. एलआयसीच्या एकूण व्यवसायात १०.११ टक्के वाढ झाली आहे.

Advertisement

दरम्यान, व्यवसायात वाढ झाली असली, तरी दुसऱ्या बाजूला एलआयसीच्या दाव्यांमध्येही मागील वर्षभरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. एलआयसीने कोरोना संकटात २ कोटी १९ लाख दाव्यांची पूर्ती केली. यासाठी १.१७ लाख कोटी खर्च केल्याचे एलआयसीने म्हटलं आहे. महामंडळाने ९.५९ लाख मृत्यू दाव्यांची पूर्तता केली असून, त्यासाठी तब्बल १८१३७.३४ कोटी रूपये खर्च केले आहेत.

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply