Take a fresh look at your lifestyle.

रेमडीसिव्हीर न्यूज : केंद्राने दिला दिलासा; तर महाराष्ट्राच्या ऑक्सिजन कोट्यातही केली वाढ

पुणे :

Advertisement

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या आणि लोकसंख्या यांच्या मेळानुसार राज्यात रेमडीसिव्हीर औषध आणि ऑक्सिजन कोट्यातही वाढ करण्याची मागणी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने या दोन्हीबाबत महत्वाची घोषणा केली आहे.

Advertisement

महाराष्ट्र भाजपने याबाबतची माहिती ट्विटरवर दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, केंद्रातील मोदी सरकार महाराष्ट्रावर आलेल्या या भीषण कोरोनाच्या संकटात मदतीसाठी पुन्हा एकदा धावून आली आहे. महाराष्ट्राच्या ऑक्सिजन कोट्यात वाढ करण्यात आली असून तो १६४६ मेट्रिक टनहून १६६१ मेट्रिक टन एवढा करण्यात आला आहे. राज्यात नाशिक आणि मुंबिया येथील दुर्घटनेमुळे एकूणच आरोग्य व्यवस्थेच्या विरोधात प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच भाजप आणि महाविकास आघाडी यांच्याकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अशावेळी ही वाढ काहीअंशी का होईना दिलासादायक मानली जात आहे.

Advertisement

तसेच त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रातील रेमडीसिव्हीरचा तुटवडा पाहता मोदी सरकार महाराष्ट्राला २१ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत सर्वाधिक २,६९,२०० रेमडीसिव्हीरचा पुरवठा करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण मदतीसाठी मोदी सरकारचे मनःपूर्वक आभार. तसेच भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उभारलेल्या बावडा ग्रामीण रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी त्यांनी तब्बल १७ कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशीही पोस्ट शेअर करण्यात आलेली आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply