Take a fresh look at your lifestyle.

म्हणून हरीश साळवे करोना केसपासून झालेत दूर; पहा नेमके काय आहे कारण

दिल्ली :

Advertisement

देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे याबाबतच्या कार्यवाहीचे प्लॅनिंग मागितले आहे. या प्रकरणात शुक्रवारी ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांना नियुक्त केले होते. मात्र, साळवे आणि सर्वोच्च न्यायालायचे सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्यातील संबंध यावरून चर्चा सुरू झाली. त्यामुळे साळवे यांनी आपणहून यातून बाजूला होण्याचे पत्र दिले आहे.

Advertisement

सरन्यायाधीश बोबडे यांनी हरीश साळवे यांना या प्रकरणातून माघार घेण्यास परवानगी दिली आणि आता याची सुनावणी मंगळवारी (27 एप्रिल) होणार आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची सुनावणीमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णालयांमधून मृत्यूच्या बातमीवर भाष्य केले. सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, ऑक्सिजनच्या अभावामुळे लोक मरत आहेत. त्यावर ठोस कार्यवाही आवश्यक आहे.

Advertisement

ऑक्सिजनचा पुरवठा आणि कोरोना विषाणूच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधे आणि साथीच्या आजारांवर लस कशी दिली जावी यासंबंधी राष्ट्रीय योजना सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी केंद्र सरकारला दिले होते. देशातील सर्वात मोठ्या कोर्टाने देशातील गंभीर परिस्थितीची स्वत:च दखल घेतली आहे. तर दिल्ली उच्च न्यायालय म्हणाले की, आपल्या सर्वांना माहित आहे की रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर्स नसल्यामुळे देश देवाच्या भरवशावर चालू आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply