Take a fresh look at your lifestyle.

सचिन वाझे प्रकरण : तिसरा अधिकारीही अटकेत; पहा नेमका काय हात होता यामध्ये

मुंबई :

Advertisement

एंटिलिया स्फोटक प्रकरणात अटक असलेल्या निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्यासह आता आणखी एक तिसरा अधिकारी चतुर्भुज झाला आहे. राष्ट्रीय तपास संस्था यांनी यापूर्वीच या प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक वाझेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझीला सुद्धा अटक केली होती. अटक झालेल्या तिसऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे पोलिस निरीक्षक सुनिल माने.

Advertisement

आज दुपारीच मानेला स्थानिक न्यायालयात हजर करून एनआयए कोठडी मागितली जाणार आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणी अटकेत असलेल्या वाझे यानेच पुढे यांना सगळ्यांना हाताशी धरून पुरावे नष्ट केलेले आहेत. मनसुख हिरेन हत्येचा तपास करणाऱ्या महाराष्ट्र ATS ने माजी पोलिस काँस्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकीला अटक करून कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना देखील NIA च्या हवाली करण्यात आले होते. सध्या हे दोघेही न्यायलयीन कोठडीत आहेत.

Advertisement

काझीने देखील वाझेला स्फोटके ठेवण्यात मदत केली होती असा आरोप आहे. काझीच्या जबाबानंतरच सुनिल मानेला अटक करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी रोजी अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये जिलेटीनच्या 20 कांड्या सापडल्या होत्या. 5 मार्च रोजी या कारचा मालक मनसुख हिरेनचा मृतदेह रेती बंदर परिसरात सापडला. यांना महाराष्ट्र ATS ने हत्येचा तपास सुरू केला आणि दोन जणांना अटक केली. त्यानंतरच तपासात एनआयएची एंट्री झाली आणि वाझेला अटक करून संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करण्यात आला.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply