Take a fresh look at your lifestyle.

कृषी प्रश्नोत्तरे | पीक संरक्षण औजारे यांच्याबाबतची सर्व माहिती

प्रश्न उत्तर पीक संरक्षणासाठी फवारणीसाठी कोणत्या प्रकारच्या यंत्राचा वापर करतात?

Advertisement

उत्तर: पीक संरक्षणासाठी मुख्यत्वे पावडरयुक्त कीडनाशकांसाठी धुरळणीयंत्रे व द्रवरुप अषिधासाठी नेपसेंक स्प्रेअर, क्रॉम्प्रेशर पंप, पेट्रोल पंप, यंत्रावर चालणारी एच.टी. पंप, बुम स्प्रेअर, मिस्ट ब्लोअर इ. प्रकारचे साधनांचा वापर करण्यात येतो.

Advertisement

प्रश्न : कोरडवाहु क्षेत्रामध्ये सुर्यफुल, करडई, भुईमुग, ज्वारी, मुग, हरभरा, तुर इ, पिकांसाठी पाण्याची दुर्मिष्य असलेल्या ठिकाणी किफायतीशीर कोणत्या साधनांचा वापर करता येईल?

Advertisement

उत्तर: पाण्याची उपलब्धता नसलेल्या ठिकाणी पावडस्युक्त किटकनाशके उदा. लिङेन, मिथिलपॅराथिऑन, फे नवेलरेट ०.४ % डस्ट चा वापर करण्यासाठी धुरळणी यंत्राचा वापरकरावा .

Advertisement

प्रश्न:अल्पभुधारक शेतकऱ्यांना  कमी क्षेत्रावर फवारणीसाठी कोणत्या साधनांचा वापर करावा?

Advertisement

उत्तर : अल्पभुधारक शेतकऱ्यांना कमी क्षेत्रावरील भाजीपाला, कडधान्ये व इतर पिकाच्या प्रभावी नियंत्रणासाठी मानवचलीत फुट स्प्रेअर किंवा पाठीवरील नॅपसॅक पंपाचा वापर करावा.

Advertisement

प्रश्न: फळबागेसाठी कोणत्या पंपाचा वापर करावा?

Advertisement

उत्तर: फळबाग पिकांसाठी मुख्यत्वे लहान क्षेत्रासाठी लहान झाडावर फवारणीसाठी गटूर किंवापेट्रोल पंपाचा वापर करावा तसेच मोठ्या फळवागेसाठी एच.टी.पी. सारख्या १.५ ते३.० अश्वशक्तीवर चालणाऱ्या साधनांचा वापर करावा.

Advertisement

प्रश्न : पिकसंरक्षके वापरतांना हेक्टरी किती प्रमाणात पाण्याचा व किडनाशकांचा वापर करावा? पिक उत्तर : संरक्षणासाठी वापरण्यात येणारे किडनाशके, बुरशी नाशके व तणनाशके वापरताना पिकांच्या प्रकारानुसार उदा. भाजीपाला, तृणधान्ये व कडधान्ये यांसाठी हेक्टरी शिफारशीत औषधांची मात्रा ५०० ली पाण्यात फवारावे तसेच फळवागेसाठी पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार ७००-१००० ली पाण्याचा वापर करावा.

Advertisement

प्रश्न :  तणनाशकासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचा वापर कसा करावा?

Advertisement

उत्तर : तणनाशक वापरताना प्रामुख्याने नॅपसॅक, गटुर पंप सारख्या साधनाचा वापर करुन त्यासाठी प्रभावी नियंत्रणासाठी तणनाशकासाठीचा फ्लॅटपॅन नोझल वापरणे गरजेचेअसते.

Advertisement

प्रश्न:स्वंयचलित फवारणी यंत्रे व यंत्रावर अधारीत फवारणी यंत्रासाठी औषधांचे किती प्रमाण घ्यावे?

Advertisement

उत्तरः स्वंयचलित फवारणी यंत्रासाठी शिफारशी केल्याप्रमाणे किडनाशकाची मात्रा मि.ली हेक्टरी लागणाऱ्यापाण्यात मिसळून फवारावे, मात्र यंत्रावर अधारीत साधनासाठी औषधाची मात्रा २.५ पट करुन किंवा हेक्टरी लागणारे पाणी १/३ पट कमी करुन फवारावे.

Advertisement

उदा. क्विनॉलफॉस ५०० मि.ली ५०० ली. पाण्यात (स्वयचलित) क्विनॉलफॉस ५०० मि.ली १७० ली. पाण्यात (यंत्रावर / पेट्रोलपंप)

Advertisement

प्रश्न:किडनाशक, बुरशीनाशके व वाढीसाठीचे पोषक औषधे एकत्रित फवारणी योग्य आहे का?

Advertisement

उत्तर : किडनाशकांच्या विशिष्ट गटाचा विचार करता मिळणाऱ्या तांत्रिक माहितीच्या आधारे औषधे मिसळून वापरता येतात. परंतू बऱ्याच नवीन औषधांचा यासंबधी अभ्यास न झाल्याने एकत्रित २-३ औषधे मिसळून न फवारता स्वतंत्रपणे फवारावे.

Advertisement

प्रश्न  : औषधे फवारणी करतांना वापरण्यात येणाऱ्या साधनासंबधी कोणती काळजी घ्यावी?

Advertisement

उत्तर : शक्यतो फवारणी साधने वापरापूर्वी व नंतर स्वच्छ साबनाच्या पाण्याने धुवून घ्यावेततसेच तणनाशकाच्या स्प्रे पंपाचा वापर इतर कीडनाशकांसाठी करु नये. शक्यतोगळके स्प्रे पंपाचा वापर करु नये. तसेच फळबागेत तणनाशक फवारणी करताना झाडांवर औषध उडू नये यासाठी नोझलजवळ हुडचा वापर करावा.

Advertisement

प्रश्न : ट्रॅक्टरवर आधारित स्प्रे पंपाचा वापर कोणत्या पिकांत योग्य आहे. त्यासाठी कोणत्या प्रकारचे नोझल वापरतात?

Advertisement

उत्तर : मुख्यत्वे यंत्रचलित ट्रॅक्टर आधारित स्प्रेअर हे फळपिकावर फवारणी साठी योग्य असून त्यासाठी झाडाच्या उंचीनुसार लहान मोठया गणचा वापर करावा.

Advertisement

++++++++++++

Advertisement

स्त्रोत :
पुस्तकाचे नाव : प्रश्न शेतकऱ्यांचे उत्तरे कृषी तज्ञांची (वर्ष २०१७)
संकलक : डॉ. आनंद सोळंके, डॉ. कल्याण देवळाणकर, प्रा. मंजाबापू घोरपडे, डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. योगेश कांदळकर, डॉ. संदीप पाटील
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विस्तार शिक्षण संचालनालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर
वेबसाईट : www.mpkv.ac.in ; फोन : ०२४२६ २४३८६१ ; ईमेल : aticmpkv@rediffmail.com
पुस्तक आर्थिक सहाय्य : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), अहमदनगर (कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य)

Advertisement

++++++++++++

Advertisement

कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी 09503219649 हा मोबाईल नंबर आपल्या गाव, मित्र व संस्थेच्या व्हाटस्अॅप ग्रुपमध्ये जोडा..

Advertisement

Advertisement

Leave a Reply