Take a fresh look at your lifestyle.

आणखी एका बिग बँकेने गाशा गुंडाळला; पहा काय होणार त्याचे परिणाम?

मुंबई :
सध्या देशभरातील बँकिंग सेक्टरवर ‘संक्रात’ कोसळली आहे. अनेक बँका दिवाळखोरीत निघत असून, आपला गाशा गुंडाळत आहेत. काही बँकांचे परवाने ‘आरबीआय’ने रद्द केले आहेत. त्यामुळे एकापाठोपाठ एक बँका बंद पडत आहेत. अलीकडेच अमेरिकेच्या सिटी बँकेने भारतातून आपला किरकोळ व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आणखी एका दुसर्‍या परदेशी बँकेने भारतातून आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

दक्षिण आफ्रिकेत दुसर्‍या क्रमांकाची बँक असलेल्या फर्स्ट रँड बँकेने (FirstRand Bank) भारतातील आपला व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठक घेऊन बँक कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. फर्स्ट रँड बँकेची भारतात एकमेव मुंबई येथे शाखा आहे. तिलाही आता कुलूप लागले जाणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील एकमेव शाखा बंद झाल्याने कर्मचारी निराश झाले आहेत.

Advertisement

कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर
बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की “भारतातील ‘फर्स्ट रँड’च्या रणनीतीचा आढावा घेतल्यानंतर विद्यमान शाखा प्रतिनिधी कार्यालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बँकेच्या या निर्णयाचा तेथे काम करणाऱ्या लोकांच्या नोकर्‍यावर परिणाम होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या फर्स्ट रँड बँकेने मुंबईत पहिली किरकोळ आणि व्यावसायिक शाखा सुरू केली. ही बँक दक्षिण आफ्रिकेतील दुसर्‍या क्रमांकाचा वित्त गट म्हणून ओळखला जातो. 2009 मध्ये त्यांना बँकिंग परवाना मिळाला. सुरुवातीला फर्स्ट रँड बँक गुंतवणूक बँकिंग व्यवसाय करीत होती, परंतु नंतर ती किरकोळ व्यवसायात दाखल झाली.

Advertisement

अमेरिकन सिटी बँकेने आपल्या ‘ग्लोबल बिझिनेस स्ट्रॅटेजी’नुसार भारतातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही बँक आता आशिया, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका या देशांसह 13 उदयोन्मुख बाजारपेठांमधील आपला किरकोळ बँकिंग व्यवसाय गुंडाळणार आहे. सिटी बँकेच्या भारतात 35 शाखा आहेत. त्याच वेळी सुमारे 4,000 लोक ग्राहक बँकिंग व्यवसायात काम करतात. 1902 मध्ये सिटी बँकने भारतात प्रवेश केला आणि 1985 मध्ये बँकेने ग्राहक बँकिंग व्यवसाय सुरू केला.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply