Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. आणखी एका बँकेला टाळे; तुमचे पैसे नाहीत ना ‘या’ बँकेत?

मुंबई :
मागील काही दिवसांपासून देशातील बँका अडचणीत आल्या आहेत. एकामागून एक बँका बंद पडत आहेत. त्यामुळे आपला पैसा बँकेतही सुरक्षित नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाला असून, आयुष्याची पुंजी नेमकी ठेवावी कुठे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अडचणीत आलेल्या बँकांना ‘आरबीआय’ने (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) थेट टाळे ठोकले असून, त्यात आणखी एका बँकेची विकेट गेली. या बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केला आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (अमरावती) चा परवाना रद्द केला आहे. या बँकेकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नाही. ठेवीदाराची परतफेड करण्यास ती बँक सक्षम नाही, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. ‘आरबीआय’ने म्हटले आहे, की बँकेने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, ते 98 टक्के ठेवीदारांना पूर्णतः परतावा देण्यास सक्षम आहेत. डिपॉझिट इन्श्यॉरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) परतावा करेल.

Advertisement

लिक्विडेशन (बँक बंद पडल्यास) झाल्यास प्रत्येक ठेवीदारास ठेवी विम्याच्या दाव्यांतर्गत 5-5 लाखांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. हे DICGC कायदा 1961च्या तरतुदीखाली आहे. भाग्योदय फ्रेंड्स अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या बँकिंग व्यवसायावर 23 एप्रिलपासून बंदी घातली आहे. भाग्योदय बँकेकडे भांडवल नसल्याने आणि बँकिंग नियमन कायदा 1949 मधील अनेक तरतुदी पूर्ण करू शकत नसल्याने आम्ही परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला, असंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं आहे.

Advertisement

भाग्योदय बँकेचा परवाना रद्द करण्यापूर्वी ‘आरबीआय’ने दुसर्‍या एका बँकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. ‘संबंध फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड असे या बँकेचे नाव आहे. बँकेची फसवणुक झाल्यावर निव्वळ मालमत्ता आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी होऊ लागली. अलिकडच्या काही महिन्यांत बँकेची आर्थिक स्थिती आणखी खराब होत गेली. त्यामुळे आरबीआयने या बँकेलाही नोटीस बजावली आहे.

Advertisement

‘संबंध’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक किडो यांना या घोटाळ्याचा मुख्य आरोपी मानले जाते. दीपक किडो यांना चेन्नई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
संपादन : सोनाली पवार 

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply