Take a fresh look at your lifestyle.

‘गुगल मॅप’मध्ये येणार नवे फिचर; युझर्सचा होणार असा फायदा..!

मुंबई :

Advertisement

‘गुगल मॅप’मुळे (Google Maps) हल्ली प्रवास करणे खूप सोपे झाले आहे. कोणालाही पत्ता न विचारता, गुगल मॅपच्या साहाय्याने आपण इच्छित स्थळी जाऊ शकतो. अर्थात कधी कधी ‘गुगल मॅप’मुळे अनेक जण अडचणीतही आले आहेत. काहींच्या तर अगदी जीवावर बेतले आहे. असो.. तुम्हीही ‘गुगल मॅप’च्या साहाय्याने प्रवास करीत असाल, तर त्यात आता काही बदल होणार आहेत. सुरक्षित प्रवासासाठी काय बदल होणार आहेत, हे समजून घेणं गरजेचे आहे.

Advertisement

‘गुगल मॅप’ कंपनी नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवे अपडेट करीत असते. त्यामुळेच हे अ‍ॅप युजर्ससाठी वापरणे अधिक सहज-सोपं झालं आहे. कंपनीने आता आणखी एक नवे फीचर आणण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑटो इवोल्युशन रिपोर्टनुसार, ‘गुगल’ आता आपल्या अल्गोरिदममध्ये बदल करणार आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मॅप सुरू केल्यानंतर, गुगल ‘सर्वात वेगवान मार्ग’ अर्थात ‘फास्टेस्ट रुट’ दाखवायचा आणि युजर्स आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचे. परंतु, आता कंपनी हे फीचर हटवणार आहे. तुम्हाला आता गुगल मॅप ‘फास्टेस्ट रुट’ दाखवणार नाही.

पेट्रोल-गॅस वाचवण्यावर भर
रिपोर्टनुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी नवे फिचर आणणार आहे. ज्यात ‘फास्टेस्ट रुट’ दिसणार नाही. तर त्याऐवजी ‘नेव्हिगेशन अ‍ॅप’ असा रस्ता दाखवेल. ज्यात युजर पेट्रोलची बचत करू शकतील. नव्या अल्गोरिदममध्ये, आता गुगल मॅपने इंधन बचतीवर भर दिला आहे. प्रवासादरम्यान किती गॅस किंवा पेट्रोल खर्च होईल, असा मार्ग आता गुगल मॅप दाखवणार आहे.

Advertisement

नव्या फीचरच्या मदतीने कार्बन कमी करण्यास मदत होईल. रिपोर्टमध्ये असंही सांगण्यात आलं आहे, की वेगवान मार्गाचा पर्याय पूर्णपणे बंद केला जाणार नाही. युजर जर पेट्रोल आणि गॅसबचतीच्या मार्गाचा अवलंब करु इच्छित नसल्यास, तो ‘फास्टेस्ट रुट’चाही पर्याय निवडू शकतो.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply