Take a fresh look at your lifestyle.

‘त्यामुळे’ झाली नाशिकची ऑक्सिजन दुर्घटना; पहा नेमका काय घडला होता प्रकार

नाशिक :

Advertisement

नाशिक येथील ऑक्सिजन टाकीच्या वायुगळतीने तब्बल 24 रुग्णांचा जीव गेला. त्यामुळे या घटनेबद्दल देशभरातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेत स्थानिक प्रशासन आणि ठेकेदार यांचीच चूक असल्याचे स्पष्ट झालेले आहे. अगोदरच गळतीबाबतची माहिती मिळूनही त्यावर वेळीच कार्यवाही करण्यास तंत्रज्ञ टीम उपलब्ध नसल्याने ही मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आलेले आहे.

Advertisement

टंॅकरमध्ये अाॅक्सीजन भरतानाच ‘प्रेशर कंट्राेल’ न झाल्यामुळे गळती झाली होती. अाॅक्सिजन पुरवठा करणारी टाकी भरली जात असते तेव्हा तेथे ठेकेदाराचे तंत्रज्ञ अनुपस्थित होते. त्यामुळे प्रकरणात टायाे निप्पाेन या ठेकेदार कंपनीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिका व पाेलिसांनी काढला अाहे. महापालिका अायुक्त कैलास जाधव यांनीही याची माहिती दिली आहे. यातील महत्वाचे मुद्दे असे :

Advertisement
  1. अाॅक्सिजन पुरवठा करणारी टाकी भरली जाताना तंत्रज्ञ जागेवर असते तर तत्काळ अाॅक्सिजन पुरवठा सुरळीत करून रुग्णांचे प्राण वाचवता अाले असते.
  2. गुरूवारी दुपारी १२ वाजून १८ मिनिटांनी डाॅ हुसेन रूग्णालयातील अाॅक्सीजन टंॅकरला गळती लागून झालेली दुर्घटना संबंधित ठेकेदार कंपनीच्या अाणि यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे घडली आहे.
  3. घटना घडण्यापूर्वी काही मिनिटे अाधी ऑक्सिजन टँक लीक असल्याचे लक्षात आल्यानंतर फोटो काढून संबंधित कंपनीच्या इंजिनिअरला पाठवण्यात आले होते.
  4. फोटोत स्पष्ट दिसत नसल्याने व्हीडिओ काढण्यास सांगितल्यानंतर त्याच क्षणी पाइप फाटून गळती झाल्याचा जबाब रुग्णालयाच्या फार्मासिस्टने चौकशी समितीला दिला आहे.
  5. अाॅक्सिजन टंॅक जवळील फुटेज प्राप्त झाले असून सकृतदर्शनी टॅकरमधून अाॅक्सीजन भरताना गळती झाल्याचे दिसते. मात्र व्यवस्थित फुटेज बघून त्याची शहानिशा करून कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्त जाधव यांनी म्हटलेले आहे.

संपादन : संतोष शिंदे

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply