Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ऑक्सिजनसंकट : वर्षभर आरोग्य खाते राहिले ढिम्म; प्लांट उभारणीकडे केले दुर्लक्ष..!

पुणे :

Advertisement

सध्या ऑक्सिजन ही एक खूप महत्वाची आणि मागणीची वस्तू बनलेली आहे एरव्ही आपण श्वसनातून ऑक्सिजन घेऊनच जगत असतो. मात्र, आपल्या आरोग्याची परिस्थिती गंभीर असताना हवेतील ऑक्सिजन आपल्याला वाचवू शकत नाही. त्यासाठी स्वतंत्र अन जास्तीचा ऑक्सिजन रुग्णाला द्यावा लागतो. सध्या करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत देशावर ऑक्सिजन संकट आहे. फ़क़्त २ लाख रुपयांपासून असा छोटेखानी ऑक्सिजन प्लांट व्यावसायिक वापरासाठी उभारणे शक्य नाही. मात्र, तरीही राज्याच्या आरोग्य विभागाने वर्षभरात एकही असा प्लांट उभा न केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

Advertisement

याबाबत आपलं महानगर या मुंबईतील दैनिकाने स्पेशल स्टोरी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. दीड वर्षे झाली जगभरात करोना थैमान घालत आहे. अशावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने फ़क़्त टाळेबंदी आणि आकडेवारी जाहीर करताना कोणतेही ठोस काम केले नाही. लस, रेमिडीसिवीरसारखी औषधे आणि ऑक्सिजनची उपलब्धता हे विषय केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या प्राधान्यक्रमात कधीच आले नाहीत. त्यांनी हे बंद करा, ते बंद करा असेच अहवाल अनुक्रमे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. दोन्ही नेत्यांनी मग मन की बात किंवा फेसबुक लाईव्हच्या मदतीने याद्वारे सगळ्यांना दिलासा दिला. मात्र, हा दिलासा फ़क़्त कोरडा असल्याचे आता स्पष्ट झालेले आहे. कारण, त्या दिलास्यामध्ये प्राणवायूच नव्हता..!

Advertisement

amey tirodkar on Twitter: “‘दैनिक आपलं महानगर’ची अत्यंत महत्त्वाची बातमी. का नाही वर्षभरात ऑक्सिजन प्लांट उभारला?तहान लागल्यावरच विहीर खणणार का? याची जबाबदारी कोण घेणार? किती प्रस्ताव आले ऑक्सिजन प्लान्टसाठी? का नाही ते मंजुर केले? या सगळ्यात कोणावर कारवाई करणार? कधी होणार? https://t.co/tLltrZG9t8” / Twitter

Advertisement

गुगल सर्च करून पाहिले तर दोन लाखापासून छोटेखानी ऑक्सिजन प्लांट उभे करण्याची सोय आहे. त्याद्वारे प्रतीमिनीट 10 लीटर इतका ऑक्सिजन तयार होऊन व्यावसायिक वापरासाठी असे संयंत्र उपयोगी होते. मात्र, करोना संकटात रुग्णसंख्या कमी झाली की श्रेय घ्यायला पुढे येणारी सरकारी यंत्रणा, अधिकारी, राजकीय नेते आणि मंत्री यांच्यासह एकूण आरोग्य यंत्रणेने याकडे सपशेल दुर्लक्ष केले परिमाणी सध्या आपला देश ऑक्सिजनवर येण्याची नामुष्की ओढवली आहे. याला थेट केंद्र आणि राज्य सरकारची ढिम्म यंत्रणा जबाबदार असल्याचे सोशल मिडीयामध्ये म्हटले जात आहे.

Advertisement

राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रशासकीय पातळीवर नेतृत्व करणारे आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास वर्षभर झोपा काढताहेत का? असाच प्रश्न आपलं महानगर यांनी विचारला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, प्रदीप व्यास यांना पहिल्या लाटेच्या अनुभवातून ऑक्सिजनचे संकट चांगल्या पद्धतीने आधीच हाताळता आले असते. पण गेल्या वर्षभरात एकाही जिल्ह्याला ऑक्सिजन प्लान्टसाठी आदेश नाहीत ही वास्तविकता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. पण तुटवडा निर्माण झाल्यावर ऑक्सिन निर्मिती प्लॅन्ट उभा करण्याचा घाट आता राज्य सरकारमार्फत घातला जात आहे. एकीकडे जिल्हावार सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट निर्मितीची चाचपणी सुरू झालेली असतानाच दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात बड्या शहरातील सर्व खासगी रूग्णालयांचा स्वत:चा ऑक्सिजनचा स्वतःची अशी प्लॅन्टची यंत्रणा कार्यरत आहे हे वास्तव आहे.

Advertisement

तसेच त्यांनी व्यास यांच्या कार्यपद्धतीवरही काही मुद्दे मांडले आहेत. त्यात म्हटले आहे की, आरोग्य खात्याशी संपर्क साधला असता एकाही जिल्ह्यात ऑक्सिजन प्लान्ट बसवण्यासाठी मंजुरी दिली नसल्याची माहिती हाती आली आहे. राज्यात आठ ऑक्सिजनचे प्लान्ट असून ते रोहा, रांजणगाव, चाकण, तुर्भे, मुरबाड, औरंगाबाद, तळोजा, पनवेल येथे आहेत. एखाद्या अधिकार्‍याची साधारणपणे तीन वर्षांनंतर बदली केली जाते मात्र आरोग्य खात्यात सचिव, प्रधान सचिव म्हणून कार्यरत असणार्‍या डॉ. व्यास यांना साडेचार वर्षे झाल्यानंतरही बदली केली जात नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आरोग्य खात्यात नुकत्याच आलेल्या सचिव डॉ. निल्लिमा करकेरा यांच्याकडे नॉन कोविडची जबाबदारी असूून सध्याची कोरोनाची महामारी बघता त्यांच्याकडे सध्या विशेष असे काम दिसत नाही. असे असूनही डॉ. व्यास हे डॉ. करकेरा यांंची मदत घेण्यापेक्षा त्यांना कोविडच्या प्रतिबंधत्मक गोष्टींपेक्षा कसे दूर ठेवले जाईल याकडेच लक्ष केंद्रीत केल्याचे आरोग्य खात्यातील एका वरिष्ठ कर्मचार्‍याने आपले दै. आपलं महानगरला सांगितले.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply