Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : सेहवागने सांगितला अमित मिश्राचा ‘हा’ मजेशीर किस्सा..!

मुंबई :
दिल्ली कॅपिटलचा दिग्गज लेगस्पिनर अमित मिश्राने पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सविरूद्ध शानदार प्रदर्शन करून सामना दिल्लीच्या बाजूने वळवला. ३८ वर्षीय अमित मिश्राने ४ षटकांत २४ धावा देऊन ४ गडी बाद केले, त्यामुळे दिल्लीने मुंबईला ६ गडी राखून पराभूत केले. मिश्राच्या या पराक्रमानंतर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने त्याच्यासोबतचा आयपीएल २००८ चा एक रंजक किस्सा शेअर केला आहे.

Advertisement

वीरेंद्र सेहवागने क्रिकबझशी बोलताना सांगितले आहे की, आयपीएल २००८ मध्ये हॅट्रिक घेतल्यानंतर मिश्राने त्याचे मानधन वाढून मागितले होते. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार होता. सेहवाग म्हणाला की, अमित मिश्रा शांत व्यक्ती आहेत आणि तो सर्वांशी चांगले बोलतो. तो पटकन सर्वांशी मिसळतो. म्हणूनच तो त्याच्या सहकाऱ्यांचा आवडता आहे. मला आठवते की जेव्हा त्याने पहिल्यांदा हॅटट्रिक घेतली तेव्हा मी त्याला तुला काय हवे आहे असे विचारले आणि तो म्हणाला वीरुभाई कृपया माझे मानधन वाढवा. सेहवाग पुढे म्हणाला की, आता त्याला इतके पैसे मिळतात की दुसरी हॅटट्रिक घेतल्यावरही तो मानधन वाढून मागणार नाही.

Advertisement

अमित मिश्राने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ बळी घेऊन मोठा विक्रम केला आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा ४ विकेट घेणारा तो गोलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात अमित मिश्रा हा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. अमित मिश्राने आतापर्यंत १५२ आयपीएल सामन्यांमध्ये १६४ बळी घेतले आहेत. अमित मिश्राने आयपीएलमध्ये तीन वेळा हॅटट्रिक घेतली आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply