Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : रोहितचा दिलदारपणा; संघाला धक्के देणाऱ्यालाच देऊन टाकले ‘हे’ गिफ्ट..!

मुंबई :
मुंबई इंडियन्सला मंगळवारी आयपीएल सामन्यात दिल्ली कॅपिटलकडून पराभव पत्करावा लागला असला तरी कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतर सगळ्यांची मनं जिंकली आहेत. दिल्लीविरुद्धचा सामना गमावल्यानंतर रोहित शर्माने विरोधी संघाचा वेगवान गोलंदाज अवेश खानला एक खास भेट दिली आहे. या सामन्यात अवेश खानने मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव आणि राहुल चहरला बाद करून त्यांना चांगलाच धक्का दिला. परंतु सामना संपल्यानंतर रोहित शर्माने अवेशच्या जर्सीवर ऑटोग्राफ देवून आपल्या फॅनचे मन जिंकले आहे.

Advertisement
View this post on Instagram

A post shared by Delhi Capitals (@delhicapitals)

Advertisement

दिल्ली कॅपिटलने आपल्या अधिकृत हँडलवरून अवेश खान आणि रोहित शर्माची छायाचित्रे शेअर केली आहेत. दिल्ली कॅपिटलने लिहिले की, ‘सामन्यानंतर अवेश खान फॅन बॉय झाला.’
लेगस्पिनर अमित मिश्राच्या यशस्वी स्पेलमुळे दिल्ली कॅपिटलने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखून पराभव केला. मुंबईच्या १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने सलामीवीर शिखर धवन (४५) आणि स्टीव्ह स्मिथ (३३) च्या खेळीमुळे १९.१ षटकांत चार विकेट गमावून १३८ धावा फटकावल्या. मिश्राच्या फिरकीसमोर मुंबईचा संघ ९ विकेट गमावत १३७ धावाच करू शकला. मिश्राने या सामन्यात २४ धावा देत ४ गडी बाद केले.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply