Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : अन भर मैदानात राहुल गोलंदाजावर चिडला; पहा, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल

मुंबई :
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध किग्ज इलेव्हन पंजाबची फलंदाजी खूपच खराब झाली आणि त्यामुळे त्यांचा संपूर्ण संघ १२० धावांवर बाद झाला. गोलंदाजीसाठी पंजाब संघाला चेन्नईच्या स्लो खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजांकडून मोठ्या आशा होत्या. पण जॉनी बेअरस्टो आणि वॉर्नरच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७३ धावा जोडल्या. हैदराबादच्या फलंदाजांवर दबाव आणण्यात पंजाबचे गोलंदाज अपयशी ठरले आणि म्हणूनच सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुल त्याच्या गोलंदाजांवर चिडलेला दिसला.

Advertisement

हैदराबादच्या डावाच्या सहाव्या षटकात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीपने क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली नाही. ज्यामुळे पंजाबचा कर्णधार केएल राहुल त्याच्यावर खूप चिडला. सामन्यादरम्यान केएल राहुलचा चेहरा स्पष्टपणे रागावलेला दिसत होता आणि तो अर्शदीपकडे पाहून ओरडत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राहुलने आपला राग व्यक्त केल्यानंतर अर्शदीपने योग्य लाईन आणि लेंथवर चेंडू टाकला.

Advertisement

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने पंजाब संघाचा ९ गडी राखून पराभव केला. पंजाबचा हा सलग तिसरा पराभव आहे. आयपीएलचा पहिला सामना पंजाब संघाने जिंकला होता पण त्यानंतर सलग तिन्ही सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामात हैदराबादने आयपीएलचा पहिला विजय मिळविला आहे. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply