Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : आता ‘या’ पाचव्या खेळाडूलाही मिळाली महिंद्राची ही गाडी भेट

मुंबई :
मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने शानदार प्रदर्शन केले. या मालिकेतील ऐतिहासिक विजयात सहा युवा क्रिकेटपटूंनी भारतीय संघाच्यावतीने या मालिकेत पदार्पण केले. त्यांनी आपल्या प्रदर्शनाने सर्वांची मने जिंकली. त्यानंतर महिंद्र ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनीही या विजयाबद्दल टीमच्या सहा खेळाडूंना भेट म्हणून आपली न्यू जनरेशन थार एसयूव्ही देण्याचे आश्वासन दिले. भारतीय फलंदाज शुभमन गिलही महिंद्रांच्या या पारितोषिक मिळवणाऱ्यांच्या यादीत सामील होता.

Advertisement

Shubman Gill on Twitter: “It’s a great feeling to receive the Mahindra Thar and I wish was there to collect this beast. @anandmahindra Sir I am grateful and a big thank you to you for this gesture. Playing for India has been an honour and I will strive to give my best everytime I step out on the field. https://t.co/Dj82w1oSJ8” / Twitter

Advertisement

महिंद्रा यांनी ट्वीट करून लिहिले की, या तरुणांच्या संघर्ष आणि परिश्रमामुळे ते मनापासून प्रभावित झाले आहेत. त्यांच्यामुळे तरुणांना सर्व अडचणींविरूद्ध लढा देवून पुढे जाण्याची प्रेरणा मिळत असल्याने ही भेट देत आहे. आश्वासन दिल्यानुसार आनंद महिंद्रा यांनी या सर्व युवा क्रिकेटपटूंना थार एसयूव्ही वितरित करण्यास सुरवात केली. त्यांनी आतापर्यंत एकूण पाच क्रिकेटपटंूना बक्षीस म्हणून अत्यंत लोकप्रिय एसयूव्ही भेट म्हणून दिली आहे.

Advertisement

anand mahindra on Twitter: “Theirs are true ‘Rise’ stories; overcoming daunting odds in the pursuit of excellence. They serve as an inspiration in all arenas of life. It gives me great personal pleasure to gift each of these debutants an All New THAR SUV on my own account—at no expense to the company. (2/3) https://t.co/5aiHSbOAl1” / Twitter

Advertisement

यामध्ये शुभमन गिलचा समावेश असून सध्या तो आयपीएल २०२१ च्या सामन्यात व्यस्त आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी एसयूव्हीची डिलिव्हरी घेतली असून या भेटीबद्दल त्यांनी आनंद महिंद्रा यांचे आभार मानले आणि आपल्या नवीन एसयूव्हीचे फोटो शेअर केले आणि ट्विट केले, सर मी कृतज्ञ आहे, या भेटवस्तूबद्दल आपले मनापासून आभार. भारताकडून खेळणे हा माझा सन्मान आहे आणि प्रत्येक वेळी मी जेव्हा मैदानात उतरेन तेव्हा चांगल्या खेळासाठी प्रयत्न करेन, असे तो म्हणाला. दरम्यान, शुभमन, सुंदर, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, टी नटराजन यांना आनंद महिंद्रांकडून थार एसयूव्हीची भेट मिळाली आहे. आता फक्त नवदीप सैनीला ही गाडी मिळणे बाकी आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply