Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : दिनेश कार्तिकने केला विक्रम; धोनी, रोहितनंतरचा हा ठरला तिसराच खेळाडू..!

मुंबई :
आयपीएलचा १५ वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात असून या सामन्यात कोलकाताचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने सामन्यात पाऊल टाकताच आपल्या नावावर विक्रम नोंदविला आहे. या विक्रमामुळे तो धोनी, रोहित शर्मासारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत जावून बसला आहे. दिनेश कार्तिक आयपीएलचा २०० वा सामना खेळत असून असे करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे.

Advertisement

दिनेश कार्तिक चेन्नईिवरुद्ध खेळत असलेला सामना त्याचा आयपीएलच्या कारकिर्दीतील २०० वा सामना आहे. असे करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी हा विक्रम मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या नावावर आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये २०४ सामने खेळला आहे आणि असे करणारा तो पहिला खेळाडू आहे.

Advertisement

आकडेवारी पहा
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू :
२०८ – एमएस धोनी
२०४ – रोहित शर्मा
२०० – दिनेश कार्तिक
१९७ – सुरेश रैना
१९५ – विराट कोहली  

Advertisement

दरम्यान, कार्तिक हा टी २० स्पेशलिस्ट खेळाडू म्हणून ओळखला जातो. विकेट किपींगसोबत आपल्या रचनात्मक बॅटिंगसाठी तो ओळखला जातो. भारताला अनेक टी २० सामन्यात विजय मिळवून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. विशेषत: बांगलादेशविरुध्द श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या टी २० तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये  शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना त्याने सौम्य सरकारला लगावलेला सिक्सर आजही करोडो भारतीयांच्या मनात घर करुन आहे.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply