Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून राशिदच्या फिरकीपुढे गेलची होते बोलती बंद; पहा बुधवारी काय घडले ते..!

मुंबई :
टी २० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल नावाचे वादळ सर्वांच्याच परिचयाचे आहे. गेल फलंदाजीला आला की भल्याभल्या फलंदाजांना घाम फुटतो आणि त्यांची बोलती बंद होते. आयपीएलमधली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम गेलच्या नावावर आहे. मात्र आयपीएलमध्ये एक असा गोलंदाज आहे, ज्याच्यापुढे गेलची बोलती बंद होते. तो गोलंदाज म्हणजे राशिद खान. बुधवारीही असाच प्रकार दिसून आला. आयपीएल सामन्यामध्ये राशिद खानच्या जादुई फिरकीच्या जाळ्यात पुन्हा गेल सापडला आहे.

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या या सामन्यात राशिदने गेलला बाद केले आणि यासह तो टी २० मध्ये सर्वाधिक वेळा गेलला बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. नवव्या षटकातील चौथ्या चेंडूवर राशीदने गेलला एलबीडब्ल्यू बाद केले. टी २० मध्ये पाचव्यांदा त्याने असा पराक्रम केला आहे. गेलला ड्वेन ब्राव्होने ७ वेळा तर हरभजनसिंगने ६ वेळा बाद केले आहे.

Advertisement

दरम्यान, राशिदने २०१७ मध्ये पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तो सनरायझर्स संघाचा महत्त्वाचा सदस्य झाला आहे. पहिल्याच सत्रात रशीदने आपल्या जादुई फिरकीने दिग्गज फलंदाजांना त्रास दिला. पहिल्या सत्रात त्याने १४ सामने खेळले आणि १७ गडी बाद केले. तसेच त्याचा इकॉनॉमी रेटही खूप कमी होता. आयपीएलपासून राशिदच्या कारकीर्दीला नवा आयाम मिळाला आणि त्याने जगातील सर्व लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. त्याने आयपीएलमध्ये ६६ सामने खेळले आहेत आणि ८० बळी घेतले आहेत. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply