Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : तर कलेक्टर-एसपी यांच्यावरच होणार कारवाई; भारतभरात डीएम कायदा कठोरपणे लागू..!

पुणे :

Advertisement

सध्या देशभरात ऑक्सिजन हा एक महत्वाचा मुद्दा बनलेला आहे. वाढते करोना रुग्ण आणि त्यांच्यावर उपचाराचा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या देशभरात ऑक्सिजनचे वेगाने वाहतूक करावी लागत आहे. यामध्ये कोणत्याही जिल्हा आणि राज्यात अडथळे येऊ न देता ही वाहतूक सुरळीतपणे चालू ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यासाठी भारतभरात भारतभरात डीएम कायदा कठोरपणे लागू करण्यात आलेला आहे.

Advertisement

कोणत्याही आडकाठीशिवाय वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन व पुरवठा तसेच एका राज्यातून दुसर्‍या राज्यात त्याची वाहतूक करण्याचे निर्देश केंद्र सरकारने गुरुवारी दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक जबाबदार असतील, असेही त्यात स्पष्ट केलेले आहे. रूग्णांच्या वाढती संख्येमुळे ऑक्सिजनची मागणी वाढल्यामुळे काही राज्यांनी इतर राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा खंडित केल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी याबाबतच्या स्पष्ट सूचना दिलेय आहेत.

Advertisement

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम (Disaster Management Act) 2005 अन्वये आदेश दिले आहेत की, गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजनची अखंड उपलब्धता महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आवश्यकतेनुसार ऑक्सिजन पुरवठा राखणे आवश्यक आहे. त्यातील अडथळे दूर करण्यासाठी कलेक्टर आणि संबंधित जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे.

Advertisement

मंत्रालयाने असे म्हटले आहे की, ऑक्सिजन उत्पादकांवर कमाल मर्यादेची मर्यादा असू नये आणि पुरवठा करणारे कुठेही असले तरी त्यांच्याकडून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कार्यवाही करावी. ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी काम करणाऱ्या कोणत्याही वाहनांना वेळेची मर्यादा न ठेवता शहरात मोकळेपणे फिरण्याची परवानगी देण्यात यावी आणि त्यांच्यावर कोणतेही निर्बंध नसावेत.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply