Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. पोटनिवडणूक भोवली; हजारोंच्या सभा घेणारे नेते गेल्यावर पंढरपुरात वाढला धोका..!

सोलापूर :

Advertisement

कोरोनामुळे राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक घेण्यात आली. अनेकांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केलेली असतानाही निवडणूक आयोगाने नियमाच्या चौकटीमुळे येथे पोटनिवडणूक जाहीर केली. राष्ट्रवादीच्या ताब्यातील ही जागा हिसकावून घेण्यासाठी मग इथे भाजपने जोरदार प्रचार केला. त्यातच तिघेजण अपक्ष उभे राहून जिंकण्यासाठी लढत असल्याने ही निवडणूक पंचरंगी झाली. मात्र, आता त्या प्रचाराचे फळ या भागाला सोसावे लागत आहे.

Advertisement

निवडणूक चांगलीच अंगलट आली म्हणायची वेळ पंढरपूरकरांवर आलेली आहे. कारण या भागातील अनेक गावात वेगाने करोना रुग्णसंख्या वाढत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने ‘कुठे आहे करोना’ असे म्हणून मास्क न घालताच भाषण ठोकणारे नेते आता आपापल्या भागात जाऊन स्थिरावले आहेत. मात्र, येथील स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि मतदारांसह नागरिकांना आता करोनाची भीती वाढली आहे.

Advertisement

(2) ABP माझा on Twitter: “Pandharpur Corona Crisis | गावेच्या गावे आजारी पडू लागली असून हॉस्पिटलमध्ये रुग्ण ठेवायला जागा नाही; राष्ट्रवादी आणि भाजपच्या सभा झालेल्या गावात अनेक रुग्ण @SunilDiwan1 #NewsUpdate #ABPMajha #LatestNews https://t.co/bICiCF9Fa2” / Twitter

Advertisement

देशभरात ना रेमडेसिवीर, ना ऑक्सिजन, ना उपचारासाठी बेड अशा अवस्थेत जनतेसमोर कोरोनाचे संकट आहे. पंढरपूर भागातही सध्या असेच चित्र आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या सभा झालेल्या भोसे, बोराळे सारख्या अनेक गावात सध्या घरटी रुग्ण सापडू लागल्याचे एबीपी माझा यांच्या बातमीत म्हटलेले आहे. मंगळवेढा तालुक्यातही तब्बल 25 गावात करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात आणखी किती रुग्ण सापडणार याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार असोत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भागात दणक्यात सभा घेतल्या. मात्र, आता या सर्वाचे नेत्यांना या भागाचा विसर पडला आहे. त्याचवेळी येथील नागरिक आता आरोग्याच्या भीषण संकटात अडकले आहेत. एकही पक्षाने आणि उमेदवाराने कोणतीही कासार न ठेवता सभा घेतल्या त्यामुळे आता येथील परिस्थितीची जबाबदारी हे नेते घेणार का, असा प्रश्न केला जात आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply