Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘टेस्ला मे इश्क नही है..’; पह असे का म्हटलेय केडिया यांनी

मुंबई :

Advertisement

सध्या जगभरात अॅलन मस्क (elon musk tesla share market investment update) यांच्या टेस्ला कंपनीचा बोलबाला आहे. अनेकांना दणक्यात करोडपती करणारा हा शेअर एक हॉट विषय आहे. मात्र, याच शेअरवर जास्त प्रेम न करता योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला अनेक बाजार तज्ञांनी दिला आहे. कारण, घोषणा मोठ्या आणि प्रत्यक्षात त्या उतरणे अवघड अशी स्थिती असल्याने जपून पावले उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. त्यात आत स्टॉक गुरु विजय केडिया यांनीही भर टाकली आहे.

Advertisement

केडिया यांनी म्हटले आहे की, मला जोखीम खूप आवडते. परंतु मी टेस्लासारखे शेअर्स विकत घेत नाही. कारण उससै कोई ‘इश्क’ नहीं. स्टॉकच्या वाढीच्या मूल्यांकनांमुळे जोखीम वाढली आहे. मला असे मनोरंजन आवडत नाही. हा स्टॉक आधीपासूनच ताशी 500-600 किमी वेगाने धावला आहे. गुंतवणूकदारांनी अनावश्यक जोखीम घेऊ नये. नाहीतर त्यातून काय होऊ शकते हे सर्वांना माहित आहे.

Advertisement

इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केडिया म्हणाले की, जर तुम्ही वेगवान लॅम्बोर्गिनी चालवत असाल तर तुम्हाला वेगाबद्दल फारशी उत्सुकता असण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत तुम्ही सीट बेल्ट मात्र अजिबात काढू नये. सध्या अमेरिकन शेअर्स खरेदी करणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांमध्ये टेस्ला हा सर्वाधिक लोकप्रिय समभाग आहे. सन 2020 मध्ये हा शेअर 695 टक्क्यांनी उंचावला आहे. सध्या त्याची किंमत 900 डॉलर आहे. कॅथी वुड ऑफ आर्क इन्व्हेस्टमेंटच्या मते, 2025 पर्यंत हा शेअर आणखी 4 पट वाढू शकतो आणि 3,000 डॉलरच्या पातळीवर पोहोचू शकतो.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply