Take a fresh look at your lifestyle.

संगमनेर सर्वेक्षण : आरोग्य व पाणी या दोन प्रश्नांवर आहे नाराजी; पहा काय भावना आहे झेडपी सदस्यांबाबत

अहमदनगर :

Advertisement

‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण 2021’च्या या विश्लेषण बातमीत आज आपण संगमनेर तालुक्यातील राजकारणाच्या मुद्द्यावर संगमनेरकरांचे नेमके काय म्हणणे आहे हे पाहणार आहोत. नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हा मोठा तालुका. संगमनेर, अकोला आणि राहता या 3 विधानसभा मतदारसंघाला जोडणारा हा तालुका राजकीयदृष्ट्या सजग आहे. मात्र, येथे संगमनेर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे.

Advertisement

उलट अकोला विधानसभा मतदारसंघातून कोणाला कसा निवडून आणायचा याच्याही चाव्या थोरात यांच्याकडे आहेत. तर, राहता मतदारसंघाशी जोडल्या गेलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांमध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही चांगली पकड ठेवलेली आहे. उत्तर नगर जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्रात थोरात-विखे गटाचे राजकारण हा उत्सुकतेचा विषय असतो. तसेच संगमनेर भागातही या मुद्द्यावर चर्चा चालू असते. येथील नगरपालिका, पंचायत समिती आणि सहकारी संस्था यावर थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे. या भागात शिवसेना आणि भाजप यांचेही मतदार आहेत. मात्र, त्यांना कोणीही मोठा नेता नसल्याने हे मतदार विखुरलेले दिसतात.

Advertisement

येथील नागरिकांनीही जिल्हा परिषदेच्या कामाबद्दल नाराजीची भावनाच व्यक्त केली आहे. येथील फ़क़्त 24.5 टक्के नागरिकांनी झेडपी सदस्यांबद्दल खूप समाधानकारक काम असे म्हटलेले आहे. तर, 17 टक्के नागरिकांनी समाधान आणि तब्बल 57.5 टक्के नागरिकांनी तीव्र नाराजीची भावना असल्याचे म्हटलेले आहे. यासह पंचायत समितीच्या कामाबद्दलची नाराजी यापेक्षाही जास्त आहे. इथेही वैयक्तिक लाभाच्या योजना आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून आरोग्य सेवा देण्याच्या मुद्द्यावर नाराजी दिसते.

Advertisement

आमदारांच्या कामाबद्दलची भावना कशी आहे, या प्रश्नावरही सर्वांनी आपापले मत व्यक्त केले आहे. आमदार थोरात यांची कामगिरी समधानकारक असल्याचे 43 टक्के नागरिकांनी म्हटलेले आहे. तर, त्यांचे सध्याचे काम बरे या कॅटगरीत असल्याचे 21 टक्के नागरिकांना वाटत आहे. उरलेल्या 36 टक्के नागरिकांना त्यांच्या कामकाजाबद्दल नाराजीची भावना आहे. तळेगाव पट्ट्यात पाणी आणि साकुर भागातही शेतीच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याची भावना आहे. स्थानिक रोजगार आणि बाजारसमितीच्या कामाबद्दल नाराजीची भावना दिसते. तर, खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्याबद्दल सुमारे 68 टक्के नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

नगर जिल्ह्यात सर्वाधिक झेडपी सदस्य असलेला हा तालुका आहे. त्यातील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा पांडुरंग शेटे (साकुर गट) यांच्यासह अजय फटांगरे (बोटा गट), मिलिंद कानवडे (संगमनेर खुर्द), रोहिणी किशोर निघुते (आश्वी बुद्रुक) यांच्या कामाकाबद्दल बरी भावना दिसते. तर, भाऊसाहेब कुटे (सामानापूर गट), महेंद्र गोडगे (वडगाव पान गट), शांताबाई काळू खैरे, सीताराम राउत (घुलेवाडी), रामहरी कातोरे (धांदरफळ बुद्रुक) यांच्या कामकाजाबाबत नागरिकांची भावना नाराजीची दिसते.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement

अगोदरच प्रसिद्ध झालेले ‘अहमदनगर सर्वेक्षण’ लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.krushirang.com/tag/survey/

Advertisement

पुढील विश्लेषण प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक असे :

Advertisement
सर्वेक्षणाच्या विश्लेषणातील बातमीचा विषयप्रकाशित होण्याचा संभाव्य दिनांक
विधानसभा मतदारसंघ : संगमनेरदि. 22 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शिर्डी (राहता)दि. 23 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीरामपूरदि. 24 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : नेवासादि. 25 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : राहुरीदि. 26 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शेवगाव-पाथर्डीदि. 27 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कर्जत-जामखेडदि. 28 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदादि. 29 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : पारनेरदि. 30 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अहमदनगर शहरदि. 1 मे 2021
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply