Take a fresh look at your lifestyle.

फ्री रिचार्जच्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी वाचा ही महत्वाची माहिती; पहा नेमके काय आहे सरकारचे म्हणणे

पुणे :

Advertisement

आपणही अनेकदा नि:शुल्क (फ्री) मोबाईल रिचार्जच्या ऑफरचे मेसेज पाहिले असतील की. अनेकांनी तर याला वापरून शेअर केले असेल. मात्र, असे कोणतेही मेसेज आल्यावर लगोलग क्लिक करून शेअर करू नका. आपल्याकडे असे संदेश आले तर सावधगिरी बाळगा. कारण हे संदेश आपल्या स्मितहास्याचे रुपांतर थेट अँग्री यंग मॅन किंवा वूमननाध्ये जाऊ शकतात.

Advertisement

टेलिकॉम कंपन्यांच्या संघटनेच्या सेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) सामान्य लोकांना बनावट संदेशांच्यामार्फत फसवणूक करून न घेण्यास आवाहन केले आहे. ‘सरकारने ऑनलाइन शिक्षणासाठी १०० कोटी ग्राहकांना रिचार्ज प्लॅन देण्याचा निर्णय घेतल्याच्या’ एका बनावट मेसेजमुळे लोकांची दिशाभूल केली जात आहे. असा संदेशातील लिंकवर क्लिक केल्यावर आपला महत्वाचा तपशील चोरीला जाऊ शकतो.

Advertisement

त्यामुळे सीओएआय यांनी सूचित केले आहे की, अशा कोणत्याही दुव्यावर (लिंक) क्लिक करून फसवणूक करून घेऊ नका. हॅकर याद्वारे आपली माहिती मोबाइल फोनवरून चोरी करू शकतात. सरकार कोणतेही विनामूल्य रिचार्ज देत नाही. या बनावट संदेशांच्या माध्यमातून सरकारने ऑनलाइन शिक्षणासाठी 10 कोटी ग्राहकांना मोफत रिचार्ज देण्याचे आश्वासन दिले आहे असा दावा केला जात आहे. सरकारने या घोटाळ्याबद्दल सर्वसामान्यांना इशारा देताना सांगितले की, त्यांनी असे संदेश डिलीट करावे आणि कोणालाही पुढे पाठवू नका.

Advertisement

सीओएआयने म्हटले आहे की, त्या लिंकवर क्लिक करू नका कारण ते मोबाइल डिव्हाइसवरून डेटा आणि माहिती चोरू शकतात. या इंडस्ट्री असोसिएशनच्या सदस्यांमध्ये रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचा समावेश आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply