Take a fresh look at your lifestyle.

आश्चर्य : म्हणून सरपंच घालतायेत साष्टांग दंडवत; पहा काय म्हटलेय ग्रामस्थांनी

अहमदनगर :

Advertisement

करोनाने सगळे सामाजिक आणि आर्थिक गणित बदलून टाकले आहे. गावपातळीवर सरपंच या पदावरील व्यक्तीची जबाबदारी वाढली आहे. तसेच कर्तव्याचे भान ग्रामस्थांना देण्याचेही मोठे आव्हन आहे. हेच आव्हान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी निवडणुकीच्या आखाड्यात नाही, तर करोनातून गावाला वाचवण्यासाठी एका सरपंचांनी थेट ग्रामस्थांना साष्टांग दंडवत घातला आहे.

Advertisement

होय, ही घटना घडली आहे नगर जिल्ह्यातील कामरगाव या गावात. नगर-पुणे महामार्गावरील हे एक मोठे गाव आहे. आणि सरपंचांचे नाव आहे तुकाराम कातोरे. सरपंच कातोरे यांचा शिरसाष्टांग दंडवत घालून ग्रामस्थांना आवाहन करण्याचा फोटो सध्या सोशल मिडीयामध्ये जोरदारपणे व्हायरल होत आहे. निवडणुकीच्या अगोदर मतदारांच्या पाया पडणारे सरपंच आता ग्रामस्थ मंडळींना आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवाहन करतानाचा हा फोटो अनेकांना आवडला आहे.

Advertisement

‘बाबांनो, तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. करोनाचे संकट मोठे आहे. त्यामुळे घरात रहा. सुरक्षित रहा. एकमेकांची काळजी घ्या. टपरी व रस्त्यावर फिरत बसू नका. दवाखान्यात आता बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे आजारी न पडण्यासह करोना होणार नाही याचीही काळजी घ्या..’, असे आवाहन सध्या सरपंच कातोरे करीत आहेत.

Advertisement

ग्रामपंचायत सदस्य अॅड. प्रशांत साठे यांनी म्हटले आहे की, सरपंच कातोरे यांनी असे केल्याने ग्रामस्थांनी आणखी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. करोना हे जगावरील संकट आहे. त्याला हरवण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व सदस्य यांनी लक्ष देऊन नियोजन करावे. इतर सरकारी यंत्रणेच्या मदतीने व लोकांच्या सहभागातून आपण या संकटावर नक्कीच मात करू शकतो.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत माणूस स्वतःहून काळजी घेत नाही. तोपर्यंत करोनाला रोखणे आव्हान आहे. प्रशासनाच्या नियमांची अमलबजावणी व्हायला पाहिजे. पण फ़क़्त पोलीस आणि प्रशासन काहीच करू शकत नाहीत. त्यासाठी ग्रामस्थ व नागरिकांनीच साठ द्यायला पाहिजे. तेच सांगण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply