Take a fresh look at your lifestyle.

आमदार राजळे यांच्यावर राष्ट्रवादीने केली टीका; पहा नेमके काय केलेत आरोप

अहमदनगर :

Advertisement

लोकप्रतिनिधींनी जी कामे करायला पाहिजेत ती जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते करीत आहेत. त्याचवेळी तहसीलदारांबरोबर बैठकीचाचा देखावा आमदार करीत असून आमदारांना उशिरा शहाणपण सुचले असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शिवशंकर राजळे यांनी केली आहे. भाजप आमदार मोनिकाताई राजळे या आता या टीकेला काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना व स्व. सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानच्या वतीने कोविड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्याचे उद््घाटन करण्यात आले. खासदार सुप्रिया सुळे यांनी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यामध्ये शिवशंकर राजळे यांनी ही टीका केली. अॅड. प्रताप ढाकणे यांनी पुढाकार घेऊन हे सेंटर सुरू केल्याबद्दल खासदार सुळे यांनी यावेळी कौतुक केले.

Advertisement

प्रांताधिकारी देवदत्त केकाण, ऋषिकेश ढाकणे, तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे, नायब तहसीलदार पंकज नेवसे, बाजार समिती सभापती बन्सी आठरे, विष्णू सातपुते, जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरुडे, भाजप युवा मोर्चाचे अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश रासने, फारुक शेख, देवा पवार, हुमायुन आतार, किरण खेडकर, डॉ.राजेंद्र खेडकर, दिगंबर गाडे, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे, डॉ. दीपक देशमुख, चंद्रकांत भापकर, सोमनाथ रोडी, बबलू शिरसाट, पांडुरंग भिसे, गोरक्ष पवार आदी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

संपादन : संतोष वाघ   

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply