Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी आमदार लहामटे यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक; पहा नेमके काय घडले होते प्रकरण

अहमदनगर :

Advertisement

पंचायत समिती सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ केल्याने अकोले तालुक्यातील कॉंगेस-राष्ट्रवादी यांच्यातील राजकारण तेजीत आहे. कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेऊन आमदार किरण लहामटे यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता लहामटे आणि राष्ट्रवादी यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

आढावा बैठकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी धुडगूस घातला. लहामटे यांच्यासमोर त्यांचा कार्यकर्ता महसूल मंत्र्यांबरोबर सभागृहात अशोभनीय कृत्य करूनही आमदार काहीच हरकत घेत नाहीत. त्यामुळे त्या कार्यकर्त्याचा बोलविता धनी हे दस्तुरखुद्द लहामटे हेच आहेत. त्यामुळे लहामटे यांना यापुढील काळात जर काँग्रेस पक्षासोबत राहून काम करावे असे वाटत असेल, तर राष्ट्रवादीच्या ‘त्या’ पदाधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करून पदाचा राजीनामा घ्यावा व या कृत्याबद्दल त्यांनी माफी मागावी, असे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Advertisement

अकोल्यातील कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर व ऑक्सिजन सिलेंडर मिळवून देण्यात संगमनेर तालुक्याच्या तुलनेत राजकीय बळाचा वापर करून अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप रवी मालुंजकर यांनी केला होता. पंचायत समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस आमदार डॉ. सुधीर तांबे व डॉ. लहामटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाकचौरे, मधुकर नवले, मिनानाथ पांडे, राष्ट्रवादीचे अशोक भांगरे, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, तालुका कार्याध्यक्ष रवी मालुंजकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, नितीन नाईकवाडी आदी उपस्थित होते. 

Advertisement

मंत्री थोरात हे आमचे आमदार डॉ. लहामटे यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतात, असा आरोप मालुंजकर यांनी केल्यावर बैठकीचा नूरच बदलला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन मालुंजकर यांना सभागृहातून बाहेर काढल्यावर बैठक पार पाडली. मग माकपचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनीही फेसबुक लाईव्ह करून मंत्री थोरात यांच्यावरच टीकाटिप्पणी केली. बुधवारी पत्रकार परिषद घेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वाकचौरे, बाळासाहेब नाईकवाडी, मधुकर नवले, मिनानाथ पांडे, रमेश जगताप, मंदाबाई नवले, शिवाजी नेहे, अरिफभाई तांबोळी, विक्रम नवले, संपत कानवडे, चंद्रभान निरगुडे, शंकरराव वाळुंज, रामदास धुमाळ, साईनाथ नवले, उबेद शेख आदींनी आमदारांवर टका केली.

Advertisement

दरम्यान, यावर आमदार लहामटे यांनी म्हटले आहे की, झालेला प्रकार योग्य नव्हता. अकोले तालुक्यासाठी मदत करण्याची ग्वाही थोरात यांनी दिली आहे. बैठकीत जो गोंधळ झाला, त्याचे समर्थन करणार नाही. त्या व्यक्तीच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, पण त्या व्यक्त करण्याची पध्दत चुकली. त्याबद्दल मी त्यांना समजही दिली आहे. काही नेते त्या प्रकरणाला वेगळे वळण देत आहेत. सध्याचा कठीण काळ बघता मी कोणत्याही गोष्टीचे राजकारण करणार नाही.

Advertisement

संपादन : महादेव गवळी  

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply