Take a fresh look at your lifestyle.

हवामान अंदाज : कमी दाबाचा पट्टा सक्रिय; ‘त्या’ जिल्ह्यांत होणार अवकाळी पाऊस

पुणे :

Advertisement

वाढत्या तापमानात करोना विषाणूची रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. संचारबंदीत घरात बसण्याची अट असतानाच वाढलेल्या या तापमान आणि उकाड्याने नागरिकांची घालमेल चालू आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज आहे. राज्यातील विदर्भ व मराठवाड्यात या आठवड्यात पूर्व मोसमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

Advertisement

मध्य प्रदेश ते तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्याने ही पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या पावसामुळे शेतातील उभे पिक आणि अनेक फळबागांना मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही कमाल तापमानात वाढ होऊन काही ठिकाणी तापमानाने 40 अंश सेल्सिअस हा टप्पा पर केला आहे.

Advertisement

बुधवारी यवतमाळात सर्वाधिक ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली. उस्मानाबाद, नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, इतर अनेक जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. काल सोलापूर ३९.७, जळगाव ३८, नाशिक ३५.८, पुणे ३७.१, अकोला ३९.१, अमरावती ३८, यवतमाळ ४१.७, वर्धा ४०, नागपूर ३९.२, औरंगाबाद ३७, परभणी ३९.७ अंश सेल्सियस इतकी तापमानाची नोंद झाली आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply