Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : संचारबंदीतही दीक्षांत समारोहाचा अट्टाहास; ‘पंदेकृवी’च्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

नागपूर :

Advertisement

सध्या करोनाचे संकट अवघ्या जगावर आहे. अशावेळी दुसऱ्या लाटेत दररोज विक्रमी रुग्णसंख्या वाढत असतानाच दीक्षांत समारोह ३० एप्रिल रोजी आयोजित करण्याचा अट्टाहास अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. हा समारोह स्थगित करून नंतर घेण्याची मागणी होत आहे.

Advertisement

दीक्षांत समारोहास राज्यपाल, कृषिमंत्री यांच्यासह मान्यवरांनी तारीख दिल्याने आता त्याच तारखेला हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे. त्यासाठी चक्क विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करून उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदीतही दीक्षांत समारोहाचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

बहुतांश पात्र पीएचडी, आचार्य पदवीकांक्षीनी आवश्यक तो शुल्कभरणा करून व्यक्तिगत स्वरूपात पदवी घेण्यास उपस्थित राहणार असल्याचे कळवल्यावर या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. दरम्यान, करोना रुग्णसंख्या वाढल्याने विद्यापीठ प्रशासनाने भान ठेवून दीक्षांत समारोह स्थगित करून पुढे तो घेण्याचे निश्चित करणे अनिवार्य होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हा कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास प्रशासनाने केल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

समारोहात ज्यांचा गौरव होणार आहे त्यापैकी १८ विद्यार्थ्यांनी यास विरोध करूनही प्रशासनाने याप्रकरणी कार्यवाही केलेली नाही. रोम जळत असताना निरो फिडल वाजवण्यासारखाच हा प्रकार असून याकडे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व कृषी, आरोग्यमंत्री, कुलगुरू यांना पत्र पाठवून दीक्षांत समारोह स्थगित करण्याची मागणी डॉ. रोहित चव्हाण (अध्यक्ष, अॅग्रिकल्चरल डॉक्टरेट्स असोसिएशन) यांनी केली आहे.

Advertisement

आताच्या या समारोहास विरोध असल्याचे  असोसिएशनचे सदस्य डॉ. संदीप बोंद्रे, कृषी योद्धा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खरात, पदवीधरचे अध्यक्ष प्रणव टोम्पे, प्रहार संघटनेचे ऋषभ गावंडे यांनीही म्हंटले आहे. त्यामुळे आता प्रशासन यावर कोणती कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply