Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : संजूने सुनावले; ‘मला अपयशाची भिती नाही, मी नैसर्गिक खेळच खेळणार..’

मुंबई :
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन अपयशाने चिंतेत नाही आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आपल्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करत राहील असे तो म्हणाले. पहिल्या सामन्यात सॅमसनने धडाकेबाज शतक झळकावले. या सामन्यात रॉयल्सला पंजाब किंग्जकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सॅमसनची बॅट दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध तळपलीच नाही.

Advertisement

रॉयल्सचा चेन्नईकडून ४५ धावांनी झालेल्या पराभवानंतर सॅमसन म्हणाला, खरोखर खेळाच्या या प्रकारात असे घडते. माझा विश्वास आहे की, आयपीएलमध्ये धोकादायक फटके खेळणे आवश्यक आहे. मी आधी असेही म्हटले आहे की, जेव्हा मला यश मिळाले तेव्हा मी खूप जोखीम घेतली. हेच कारण आहे की मी शतक ठोकले आहे. म्हणून ते त्या दिवशी आणि आपल्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

Advertisement

संजू पुढे म्हणतो की, त्याला त्याच्या शॉटला आळा घालायचा नाही. शॉट्स खेळण्याची आणि त्याच्या आवडीप्रमाणे फलंदाजी सुरू ठेवण्याची इच्छा असलेल्या सॅमसनला त्याचे या मार्गावरील अपयशही मान्य केले. तो म्हणतो, मला बाद होण्याची चिंता नाही, पण आगामी सामन्यात मला संघाच्या विजयातही हातभार
लावायचा आहे.

Advertisement

आयपीएल ही एक दीर्घकालीन स्पर्धा असून काही सामने अपयशी ठरणे सामान्य आहे. सॅमसन म्हणाला, नेहमीच चांगली कामगिरी करण्याचा दबाव असतो. जेव्हा तुम्ही आयपीएलमध्ये खेळता तेव्हा दबाव असतो. काही प्रसंगी आपणास यश मिळते आणि काही प्रसंगी आपण अपयशी ठरतो. आयपीएल ही एक दीर्घकालीन स्पर्धा असून आपणास सलग १४ सामने खेळावे लागतात. अशा परिस्थितीत काही सामन्यात फेल होणे सामान्य आहे.

Advertisement

बॅटिंग ऑर्डरबाबत रॉयल्स कर्णधार म्हणाला की शिवम दुबेसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे महत्वाचे आहे. तो म्हणाला, माझ्यामते फलंदाजीचा क्रम चांगला आहे. शिवम दुबे हा एक असा फलंदाज आहे जो फिरकी गोलंदाजी व वेगवान गोलंदाजी चांगली खेळतो. क्रमांक चार त्याच्यासाठी अनुकूल जागा आहे. वास्तविक ते परिस्थितीवर अवलंबून असते, असेही तो म्हणाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply