Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : त्यामुळे झाला मुंबईचा पराभव; रोहितने सांगितले दिल्लीविरुध्दच्या पराभवाचे कारण

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सला मंगळवारी दिल्ली कॅपिटलविरुद्ध सहा विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, चांगली सुरुवात झाल्यानंतर त्यांचा संघ मधल्या षटकांत चांगली फलंदाजी करू शकला असता, परंतु असे करण्यात त्यांना अपयश आले. मुंबईच्या १३८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीने सलामीवीर शिखर धवन (४५) आणि स्टीव्ह स्मिथ (३३) यांच्या खेळीमुळे १९.१ षटकांत चार गडी गमावून १३८ धावा केल्या. यामध्ये ललित यादवनेही नाबाद २२ धावांची खेळी केली.

Advertisement

मिश्राच्या प्रभावी फिरकीसमोर मुंबईचा संघ ९ विकेट गमावून १३७ धावाच करू शकला.  मिश्राने २४ धावांत चार विकेट घेतल्या. आवेश खानने मिश्राला चांगली साथ देत १५ धावात २ गडी बाद केले. तर ऑफस्पिनर ललित यादवनेही चार षटकांत १७ धावा देऊन एक बळी घेतला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४४ धावा केल्या.

Advertisement

या सामन्यानंतर रोहित म्हणाला, ज्याप्रकारे आमची सुरुवात झाली, ते पाहता मला वाटते की आम्ही मधल्या षटकांत चांगली फलंदाजी केली असती तर चांगली धावसंख्या उभी करु शकलो असतो. आम्ही पॉवर प्लेला केलेल्या दमदार सुरूवातीचा पुढे फायदा घेऊ शकलो नाही, आम्ही पुन्हा एकदा असे करण्यात अपयशी ठरलो. याचे क्रेडिट दिल्लीच्या गोलंदाजांना जाते, त्यांनी आमच्यावर दबाव कायम ठेवला आणि विकेट घेतल्या, असेही तो म्हणाला.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply