Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : बाब्बो.. रोहितची कामगिरी पाहून घाबरली हार्दिक पांडयाची मैत्रिणही..!

मुंबई :
आयपीएल २०२१ चा १३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात होत असताना रोहित शर्माने दमदार फलंदाजी करण्यास प्रारंभ केला. ‘हिटमन’ म्हणून प्रसिध्द असलेल्या रोहितने चेपाकच्या मैदानावर एक चौकार आणि षटकार लगावत शानदार ४४ धावा फटकावल्या. या मॅचदरम्यान जेव्हा दिल्ली कॅपिटलचा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाने ५ व्या षटकातील ५ वा चेंडू मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला टाकला तेव्हा रोहितने जोरदार षटकार ठोकला. या सिक्सरची लांबी ९५ मीटर होती. हा षटकार पाहून नताशा चांगलची घाबरून गेली.

Advertisement

रोहित शर्माने जेव्हा असा उंच षटकार मारला तेव्हा त्याला पाहून हार्दिक पंड्याची मैत्रिण नताशा स्टॅनकोव्हिक स्टॅन्डमध्ये बसलेली असताना घाबरून गेली. कारण तिला वाटले की चेंडू तिच्या अंगावर पडेल. या शॉटच्या भीतीने रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहसुद्धा खुर्चीवरुन उठली.
रोहित शर्माचा सिक्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा :

Advertisement

https://www.iplt20.com/video/232571/hitman-s-95m-six?tagNames=indian-premier-league

Advertisement

दरम्यान, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने चेन्नईच्या चेपाक स्टेडियमवर नाणेफेक जिंकून दिल्लीविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने १३७ धावा केल्या आणि दिल्लीसमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले. दिल्लीकडून अमित मिश्राने चार गडी बाद केले.
 संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply