Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : ऋषभ पंत म्हणातो, दिल्लीचा ‘हा’ फलंदाज करु शकतो चमत्कार..!

मुंबई :
दिल्ली कॅपिटलने इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखून पराभव केला. यासह पॉईंट टेबलमध्ये दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऋषभ पंतने चौथ्या क्रमांकावर ललित यादवला फलंदाजीसाठी पाठविण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. त्याने ललित यादव याचे कौतुक केले असून तो चमत्कार करु शकतो, असे म्हटले आहे.

Advertisement

पोलार्डने स्टीव्ह स्मिथला बाद केल्यानंतर दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीला येईल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण पंतने ललित यादवला पाठवून सर्वांना चकित केले. ललित यादव २५ चेंडूत २२ धावा करून नाबाद राहिला. ललित यादवने मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रभावी गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत १७  धावा देऊन एक गडी बाद केला.
सामना संपल्यानंतर पंत म्हणाला की, ललित यादव हा भारताची प्रतिभावान खेळाडू आहे. तो म्हणाला की, आम्हाला त्याला तयार करायचे आहे. अशा खेळपट्यांवर तो आपल्यासाठी चमत्कार करू शकतो. चार सामन्यात दिल्लीचा हा चौथा विजय आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १३७ धावा केल्या. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ४४ धावांची खेळी केली. दिल्लीकडून फिरकीपटू अमित मिश्राने शानदार गोलंदाजी करत २४ धावांत चार गडी बाद केले.

Advertisement

अमित मिश्रा व्यतिरिक्त आवेश खानने दोन तर ललित यादवने एक विकेट घेतली. दिल्ली संघाने १३८ धावांचे लक्ष्य ५ चेंडू शिल्लक ठेवत पूर्ण केले. सलामीवीर शिखर धवनने दिल्लीकडून ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्याशिवाय स्टीव्ह स्मिथने ३३ धावांचे योगदान दिले. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply