Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : बाब्बो.. आणि पंजाबच्या पुरनने नोंदवला ‘हा’ लाजीरवाणा विक्रम..!

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ च्या १४ व्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होता. या सामन्यात हैदराबादने आपलं विजयाचं खातं उघडलं असून पंजाबचा त्यांनी ९ विकेटने पराभव केला. पंजाबचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरणचा फ्लॉप शो या सामन्यातही कायम राहिला आणि तो खाते न उघडता तिसऱ्यांदा या स्पर्धेत पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह पूरणने एक लाजीरवाणा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे.

Advertisement

निकोलस पूरण आयपीएलच्या इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे जो दोन चेंडू, एक चेंडू आणि एकही चेंडू न खेळता शून्य स्कोअरवर बाद झाला आहे. निकोलस पूरन आणि ख्रिस गेल यांच्यात धाव घेताना ताळमेळ न झाल्यामुळे पूरण एकही बॉल न खेळता शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधी राजस्थान आणि चेन्नईिवरुद्धच्या सामन्यात त्याला खाते उघडता आले नाही. या मोसमात पूरणने चार डावांमध्ये केवळ ९ धावा केल्या आहेत.

Advertisement

या सामन्यासाठी पंजाब किंग्जने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले होते. झे रिचर्डसन, रिले मेरीडिथ आणि जलज सक्सेन यांच्या जागी मोईस हेनरिक्स, फॅबियन एलन आणि मुरुगन अश्विन यांना संधी देण्यात आली. आतापर्यंत खेळलेले चारपैकी तीन सामने पंजाबने गमावले आहेत. त्यामुळे आता पंजाब किंग्ज संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply