Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला आणखी एक मोठा धक्का; ‘हा’ खेळाडू परतला मायदेशी..!

मुंबई :
राजस्थान रॉयल्सच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. आयपीएल २०२१ मधून बेन स्टोक्स दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर या संघाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनदेखील बायो-बबलमुळे झालेल्या थकवाच्या कारण सांगून घरी परतला आहे. जोफ्रा आर्चर अद्यापही फिट होवून परतलेला नाही. पॉईंट टेबलमध्ये राजस्थानचा संघ सध्या सहाव्या स्थानावर आहे.

Advertisement

आपल्या ट्विटर हँडलवर लियाम लिव्हग्स्िंटनच्या घरी परतण्याविषयी माहिती देताना राजस्थान रॉयल्सने लिहिले की, गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या बबलच्या थकव्यामुळे लियाम लिव्हिंगस्टोन काल रात्री घरी परतला. आम्ही त्याच्या निर्णयाबाबत समजू शकतो आणि आदर करतो. आम्ही त्याला सर्व प्रकारे पाठिंबा देत राहू.
राजस्थानला शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून पराभवाला सामोरे जावे लागले. राजस्थानची फलंदाजी रवींद्र जडेजा आणि मोईन अली यांच्या फिरकी जोडीसमोर पत्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या हंगामात संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले असून त्यापैकी केवळ एक विजय मिळविला आहे, तर संघ दोन सामन्यात पराभूत झाला आहे. 

Advertisement

Rajasthan Royals on Twitter: “Liam Livingstone has flown back home late last night, due to bubble fatigue accumulated over the past year. We understand and respect his decision, and will continue supporting him in any way we can. #RoyalsFamily https://t.co/stYywf3tBW” / Twitter

Advertisement

दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनकडून संघाला खूप अपेक्षा आहेत. संजू म्हणाला की, तो अपयशाने चिंतेत नाही आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या नैसर्गिक शैलीत फलंदाजी करत राहील असे म्हणाला. पहिल्या सामन्यात सॅमसनने धडाकेबाज शतक झळकावले. या सामन्यात रॉयल्सला पंजाब किंग्जकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सॅमसनची बॅट दिल्ली कॅपिटल आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध तळपलीच नाही.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply