Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : ब्राव्होच्या ‘या’ कृत्याने वाद; माजी खेळाडूंनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह

मुंबई :

Advertisement

आयपीएल २०२१ च्या १२ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा ४५ धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेने ९ विकेट गमावून १८८ धावा केल्या. या सामन्यात सीएसकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो एका घटनेमुळे वादात सापडला आहे. चेन्नईच्या डावाच्या शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सचा मुस्तफिजुर रहमान चेंडू टाकत असताना नॉन-स्ट्राइक एंडवर बॅटिंगसाठी उभा असलेल्या ब्राव्होने बॉलरने चेंडू फेकण्यापूर्वी क्रीजच्या बाहेर जात धाव घेतली. ब्राव्होच्या या कृत्याबाबत माजी खेळाडूंनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

Advertisement

ब्राव्होच्या या कृत्याचा फोटो शेअर करताना भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की, गोलंदाज काही इंचांनी रेषेच्या पुढे गेला तर त्याला शिक्षा होईल. पण जर फलंदाज काही यार्ड पुढे गेला तर त्याला काहीच होत नाही. अशा फलंदाजाला धावबाद करण्याचा सर्व अधिकार गोलंदाजाला असतो. पण खेळ भावनेच्या हे विरोधात आहे असे म्हणणे हास्यास्पद असल्याचे तो म्हणाला.

Advertisement

Venkatesh Prasad on Twitter: “The bowler overstepping by a few inches is penalised, but a batsman backing up a few yards isn’t. The bowler has every right to run out a batsman backing up so far. PERIOD. Calling it against the spirit of the game is a joke @ICC . #CSKvRR https://t.co/vIHqbe6fWU” / Twitter

Advertisement

आयपीएल २०१९ पूर्वीही अशीच एक घटना आपण पाहिली होती. खरं तर, आयपीएलच्या १२ व्या मोसमात राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना खेळला जात होता, तेव्हा आर अश्विनच्या गोलंदाजीवर जोस बटलर बॉल टाकण्यापूर्वी क्रीजच्या बाहेर आला. यानंतर अश्विनने त्याला बाद केले. अश्विन आणि बटलरची ही घटना नंतरही वादग्रस्त ठरली होती.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply