Take a fresh look at your lifestyle.

हौसेला मोल नाही.. कोरोना संकटातही सोन्याची आवक ‘इतकी’ वाढलीय, पहा नियमात काय बदल झालाय तोही

मुंबई :

Advertisement

भारतात कधी काळी सोन्याचा (Golden India) धूर निघत होता, असे बोलले जाते. त्यामुळे सोन्याची आवड भारतीयांच्या नसानसात भिनली आहे. अंगावर भरगच्च सोने घालून मिरवण्याची भारतीयांना भारी हौस. कितीही मोठी संकटे येवो, आपले सोन्यावरील प्रेम कधी कमी होत नाही. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे, कोरोना संकटात भारत होरपळून निघत असताना, भारतात सोन्याची आयात कमी होण्याऐवजी वाढल्याचेच दिसत आहे.

Advertisement

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देश पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आलाय. देशावर पुन्हा एकदा आर्थिक अरिष्ट कोसळण्याची शक्यता आहे. मागील वर्षभर हीच परिस्थिती असल्यामुळे बाजारपेठा ओस पडल्या आहेत. मात्र, या सगळ्याला सोनं अपवाद ठरताना दिसत आहे. कारण, कोरोनाच्या महामारीतही भारतात सोन्याची विक्रमी आयात (Import) झाली आहे.
जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलच्या (GJEPC) माहितीनुसार, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क (Import Duty) घटवले. त्यामुळे पिवळ्या धातूची मागणी आणखी वाढली आहे. सध्या सोन्यावरील आयातशुल्क 7.5 टक्के इतके आहे. मार्चच्या आकडेवारीनुसार, भारतात 160 टन सोन्याची आयात झाली.

Advertisement

गेल्या आर्थिक वर्षात मार्च महिन्यात देशात केवळ 28.29 टन सोने आयात करण्यात आले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अस्थिरतेमुळे गेल्या वर्षभरात सोन्याची मागणी प्रचंड वाढली आहे.
भांडवली बाजार (Share Market) आणि गुंतवणुकीच्या (Bank FD and other Investments) इतर साधनांमध्ये आर्थिक अस्थिरता निर्माण झाली आहे. गुंतवणूकदार जास्तीत जास्त पैसे सोन्यात गुंतवताना दिसत आहेत. मध्यंतरी लग्नसराई सुरु झाली होती. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढली. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात घसरण झाली. त्यामुळे सोन्याची मागणी पुन्हा वाढली.

Advertisement

का वाढलीय सोन्याची आयात?
जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काऊन्सिलच्या अंदाजानुसार, मध्यंतरी लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाले होते. त्यामुळे विविध सण-उत्सव, तसेच निर्यात पुन्हा सुरु झाल्यामुळे सोन्याची मागणी वाढली. लसीकरणामुळे कोरोनावर मात करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम सोन्याच्या मागणीवर दिसून येत आहे.
गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा सोन्याची आयात 22.58 टक्क्यांनी वाढून 34.6 अब्ज डॉलर्स इतकी झाली. सोन्याच्या आयातीमुळे चालू खात्यातील तूट वाढते. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार देशांतर्गत सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याने आयातीचे प्रमाण वाढले आहे.

Advertisement

1 जूनपासून नवे नियम
देशात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक दागिन्यावर ‘हॉल मार्किंग’ असणे आवश्यक आहे. हा नियम 1 जून 2021 पासून संपूर्ण देशात लागू होईल. केंद्र सरकारने जानेवारी-2020 मध्ये म्हटले होते, की सोन्याच्या दागिन्यांवरील अनिवार्य ‘हॉल मार्किंग’ 15 जानेवारी 2021 पासून अंमलात येईल. परंतु, कोरोना महामारीमुळे सरकारने याची तारीख 1 जून 2021 पर्यंत वाढविली. ‘हॉल मार्किंग’ हा सोन्याच्या शुद्धतेचा पुरावा मानला जातो. सध्या हे ऐच्छिक आहे.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply