Take a fresh look at your lifestyle.

नाशिक घटनेवर आरोप प्रत्यारोपांचीही गळती; पहा गृहमंत्री शाह, चंद्रकांतदादा व मनसे यांनी काय म्हटलेय ते

पुणे :

Advertisement

नाशिक येथील ‘डॉ झाकीर हुसेन रुग्णालया’तील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना (nashik oxygen leak) म्हणजे आता राजकारण्यांना चघळण्याचा नवा मुद्दा बनली आहे. ऑक्सिजन व औषधे यांच्या पुरवठ्याचे खापर एकमेकांवर फोडणाऱ्या महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांनी आता नाशिक दुर्घटनेच्या मुद्द्यावर एकमेकांना पाण्यात पाहण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Advertisement

Chandrakant Patil on Twitter: “ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची नाशिकमधील झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, सगळ्या रुग्णांना लवकरच सुखरुप स्थळी व्यवस्थित हलवले जावे आणि मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे. https://t.co/y5Iseq0Dt9” / Twitter

Advertisement

यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे की, ऑक्सीजन गळतीमुळे २२ रुग्णांचे तडफडून मृत्यू झालेले असताना आरोग्यमंत्र्यांना मात्र ऑक्सिजन गळती लगेच थांबवल्यामुळे ऑक्सिजन फार वाया गेला नाही ही “मायनर” अर्थात किरकोळ घटना वाटते. राज्याचा आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो? तर, खासदार राहुल शेवाळे यांनी म्हंटले आहे की, ‘डॉ झाकीर हुसेन रुग्णालया’तील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळायला हवी.

Advertisement

काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी म्हटले आहे की, नाशिक येथील झाकीर हुसेन रूग्णालयातील घटना अतिशय वेदनादायी आणि धक्कादायक आहे. मृत पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! तर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, ऑक्सिजन गळती होऊन २२ रुग्ण दगावल्याची नाशिकमधील झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये घडलेली घटना ही अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी, सगळ्या रुग्णांना लवकरच सुखरुप स्थळी व्यवस्थित हलवले जावे आणि मृतांच्या नातेवाईकांना भरीव मदत मिळाली पाहिजे.

Advertisement

Atul Bhatkhalkar on Twitter: “ऑक्सीजन गळतीमुळे २२ रुग्णांचे तडफडून मृत्यू झालेले असताना आरोग्यमंत्र्यांना मात्र ऑक्सिजन गळती लगेच थांबवल्यामुळे ऑक्सिजन फार वाया गेला नाही ही “मायनर” अर्थात किरकोळ घटना वाटते. राज्याचा आरोग्यमंत्री इतका संवेदनहीन असू शकतो? https://t.co/fVIoTDhcbf” / Twitter

Advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याबाबत ट्विटरवर आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना मन सुन्न करणारी. एकीकडे कोरोनाशी निकराची झुंज आणि त्यात अशा दुर्घटनांमध्ये आपली माणसं दगावणं, अत्यंत क्लेशदायी. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि कुटुंबीयांप्रती सहवेदना.

Advertisement

अमित शाह यांनीही यावर आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नासिक के एक अस्पताल में ऑक्सिजन लीक होने से हुई दुर्घटना का समाचार सुन व्यथित हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। बाकी सभी मरीजों की कुशलता के लिए ईश्वर से प्रार्थना करता हूँ।

Advertisement

Amit Shah on Twitter: “नासिक के एक अस्पताल में ऑक्सिजन लीक होने से हुई दुर्घटना का समाचार सुन व्यथित हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। बाकी सभी मरीजों की कुशलता के लिए ईश्वर से प्रार्थना करता हूँ।” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply