Take a fresh look at your lifestyle.

कोपरगाव सर्वेक्षण : म्हणून लोकप्रतिनिधींबद्दल वाढत आहे नाराजी; पहा काय म्हणतायेत नागरिक

अहमदनगर :

Advertisement

‘अहमदनगर जिल्हा राजकीय – सामाजिक सर्वेक्षण 2021’मध्ये कोपरगाव येथील नागरिकांनीही आपापले मत मांडले आहे. त्यानुसार येथील नागरिकांनी विद्यमान आणि आजी-माजी लोकप्रतिनिधी व राजकीय पक्ष यांच्याबाबत नाराजीची भावना व्यक्त केली आहे. काळे-कोल्हे गटासह येथील मूळ भाजपचे असलेले वहाडणे यांच्या गटातील राजकारणात तालुका आणि शहराचे प्रमुख मुद्दे मागे पडल्याची भावना कोपरगावकरांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

ऊस बागायतीचा हा तालुका संजीवनी आणि कोसाका या दोन साखर कारखान्याच्या भोवती फिरणाऱ्या राजकारणावरच चर्चा करीत असतो. नाशिक व निफाड यांच्या जवळ असलेल्या या तालुक्यात फळबागाही मोठ्या प्रमाणात आहेत. भाजीपाला आणि उसाच्या शेतीवर भिस्त असलेला हा तालुका साधन म्हणून ओळखला जातो. तालुक्याला शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे आणि सूर्यभान वहाडणे यांच्यासह भास्करराव बोरावके यांनीही राज्यभरात ओळख निर्माण करून दिली. आताही येथील युवा पिढी तालुक्याचा विकास करून राज्यभरातील आपली ओळख पक्की करण्याची भावना ठेऊन आहे.

Advertisement

येथील विद्यमान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या कामाबद्दलही नाराजी दिसते. करोना कार्यकाळात तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरातही आरोग्याच्या सेवा आणि सुविधा यांच्यात ठोस आणि रचनात्मक असा बदल झाला नसल्याची भावना कोपरगावकरांनी व्यक्त केली आहे. तर, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. दोन्ही कारखान्याच्या जीवावर राजकारण केले जात असलेल्या दोन्ही नेत्यांकडून अशा संकटाच्या काळात आणखी ठोस कामाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडून ग्रामीण आरोग्याचे प्रश्न सोडवले जात नाहीत. तसेच शेती आणि इतर वैयक्तिक लाभाच्या योजना मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे तालुक्यात शेतकऱ्यांना कोणतीही सेवा दिली जात नसल्याचा महत्वाचा मुद्दा येथील ग्रामीण भागातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी मांडला आहे तसेच शहरी भागात रस्ते, गटारी, आरोग्य आणि स्वच्छता यांच्या कामावर कोपरगावकर नाराज आहेत.

Advertisement
प्रश्न : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कामाबाबत आपण कितपत समाधानी आहात?
उत्तर : खूप समाधानी : 14 % समाधानी : 27 % असमाधानी : 59 %
प्रश्न : आपल्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांची कामगिरी कशी आहे?
उत्तर : बरी : 27  % असमाधानी : 33 % समाधानी : 40 %

सोनाली राहुल रोहमारे (चांदे कसारे गट), राजेश परजणे (शिंगणापूर गट) यांच्या कामाबद्दल नागरिकांनी बरी भावना व्यक्त केली आहे. तर, विमल कारभारी आगवन (ब्राह्मणगाव गट), सोनाली प्रसाद साबळे (वारी गट) आणि सुधाकरराव दंडवते (सुरेगाव गट) यांच्या कामाबद्दल तुलनेने जास्त नाराजी आहे. पंचायत समितीचा कारभार आणि त्यांच्याकडून तालुक्यात विकासाच्या ययोजना राबवण्यासाठी विशेष निधी मिळत नसल्याची तक्र आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement

अगोदरच प्रसिद्ध झालेले ‘अहमदनगर सर्वेक्षण’ लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : www.krushirang.com/tag/survey/

Advertisement

पुढील विश्लेषण प्रसिद्ध होण्याचे वेळापत्रक असे :

Advertisement
सर्वेक्षणाच्या विश्लेषणातील बातमीचा विषयप्रकाशित होण्याचा संभाव्य दिनांक
विधानसभा मतदारसंघ : कोपरगावदि. 21 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : संगमनेरदि. 22 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शिर्डी (राहता)दि. 23 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीरामपूरदि. 24 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : नेवासादि. 25 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : राहुरीदि. 26 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : शेवगाव-पाथर्डीदि. 27 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : कर्जत-जामखेडदि. 28 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : श्रीगोंदादि. 29 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : पारनेरदि. 30 एप्रिल 2021
विधानसभा मतदारसंघ : अहमदनगर शहरदि. 1 मे 2021
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply