Take a fresh look at your lifestyle.

महत्वाची माहिती : आरोग्य विमा घेताय; तर ‘या’ बाबी अजिबात विसरू नका..!


मुंबई :

Advertisement

काळ-वेळ पाहून संकट येत नाही. त्यामुळे अचानक येणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी सतत सज्ज असले पाहिजे. सध्या तर प्रत्येक रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याआधीच सावध व्हा. सध्या कोरोनामुळे दवाखाने तुडुंब भरलेली आहेत. कधी बेड मिळत नाही, मिळालेच तर औषध-उपचाराचा खर्च कसा करावा, असा प्रश्न पडतो. अशा वेळी कामी येतो, आरोग्य विमा!

Advertisement

तुमच्याकडे व्यापक आरोग्य विमा सुरक्षा कवच (health insurance) असेल, तर आजारपणात हॉस्पिटलचा खर्च भागवताना तुमची कष्टाची कमाई खर्च होत नाही. अनावश्यक कर्ज डोक्यावर होत नाही. कंपनीकडून ग्रुप इन्शुरन्स (group insurance) मिळाला असला, तरी अपुरी विमा रक्कम किंवा तुम्ही नोकरी सोडल्यास त्याचा लाभ मिळत नाही. अशा वेळी तुम्ही स्वतःच आरोग्य विमा काढणे आवश्यक आहे. आरोग्य विमा घेताना काही महत्वाच्या गोष्टी ध्यानात ठेवणे आवश्यक आहेत. याबाबत समजून घेऊ.

Advertisement

फॅमिली फ्लोटर की वैयक्तिक विमा?
तुम्ही विवाहित असाल, तुम्हाला दोन मुले असतील, तर तुम्ही फॅमिली फ्लोटर (family floater / कौटुंबिक विमा) पॉलिसीचा विचार करू शकता किंवा प्रत्येकाची वैयक्तिक पाॅलिसी (individual insurance) काढू शकता. पाॅलिसी काढणाऱ्याचे वय ४५ वर्षापेक्षा कमी असेल आणि कुटुंबात तरुणांची संख्या जास्त असेल, तर ‘फॅमिली फ्लोटर’ पाॅलिसी चांगली ठरु शकते.
तुम्ही ज्येष्ठ नागरिक किंवा ६० वर्षानजीक असताल, तर वाढत्या वयानुसार रुग्णालयाची जोखीम वाढते. एका वर्षात अधिक दावे झाल्यास, इतर सदस्यांना ‘फॅमिली फ्लोटर’ पॉलिसीतील विमासुरक्षा मिळण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि वाढत्या वयाच्या सदस्यांनी व्यक्तिगत आरोग्य विमा पॉलिसी काढणे हिताचे आहे.

Advertisement

आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी विमाधारकाने स्वतःची वर्तमान शारीरिक स्थिती, राहणीमान, आजार यांचा आढावा घ्यायला हवा. आपल्या शारीरिक स्थितीनुसार विमा सुरक्षा किती असावी, याचा निर्णय घ्या. तुम्ही शहरांमध्ये राहत असाल, तर तेथील उपचारांचा खर्च विचार करता, ५ ते ७ लाख रुपयांचा आरोग्य विमा तुम्हाला पुरेसा आहे.
काही उपचारांच्या खर्चाचा समावेश आरोग्य विम्यामध्ये केला जात नाही. जसे एचआयव्ही, दातांचे उपचार, डोळ्यांचे उपचार, काही विशिष्ट थेरपी, जुने आजार या घटकांना आरोग्य विमा पॉलिसीत विमा संरक्षण दिले जात नाही. पॉलिसी बाह्यघटक कंपन्यांनुसार वेगवेगळे असू शकतात. त्याशिवाय आरोग्य विमा पॉलिसीमध्ये प्रतीक्षा कालावधीदेखील असतो. काही अटी आणि शर्थींमुळे प्रतीक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर विमाधारकाला विमा कवच उपलब्ध होते. प्रतीक्षा कालावधी कंपनीनुसार वेगवेगळा असतो.

Advertisement

आरोग्य विमा हा विविध पर्याय, फायद्यानुसार बाजारात उपलब्ध आहे. जसे प्री-हॉस्पिटल-पोस्ट हॉस्पिटलायझेश कव्हर, गंभीर आजारांवर संरक्षण, प्रसूतीसाठी विमा, वैद्यकीय तपासणी आदी सुविधा दिल्या जातात. सध्या बहुतांश कंपन्या ‘नो क्लेम बोनस’ देतात. ज्यामुळे वर्षभरात क्लेम नसल्यास तुमच्या विम्याची सम अशुअर्ड वाढते. सर्वात महत्वाचा घटक आहे, तो हॉस्पिटल नेटवर्कचा. विमा कंपनीशी संलग्न किती हॉस्पिटल आहेत आणि किती कॅशलेस (cashless) सुविधा देतात, याचाही ग्राहकांनी विचार करायला हवा.
संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply