Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाचा असाही फायदा; ‘या’ एका शब्दामुळे कंपनी मालामाल, मात्र, इन्व्हेस्टर्स झाले…!

मुंबई :

Advertisement

‘नावात काय आहे.. ‘ असे शेक्सपिअर सांगून गेला. मात्र, नावातच खूप काही लपल्याची अनेकदा समोर आले आहे. काहींना एखाद्या नावाचा फायदा होतो, तर कधी कधी नुकसानही सहन करावे लागते. सध्या देशात कोरोनाचा कहर सुरु आहे. परिणामी, कानावर सतत रेमडेसिव्हीर, ऑक्सिजन, कोरोना वॅक्सीन असे शब्द पडत आहे. 

Advertisement

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. सातत्याने शेअर बाजार (share market) कोसळल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र, कोरोनाच्या संदर्भाने सतत समोर येणाऱ्या एका शब्दामुळे एक कंपनी मालामाल झाल्याचे समोर आले आहे. कोमात गेलेल्या या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ झाली आहे.
सध्या दवाखान्यात रेमडीसीव्हर, ऑक्सिजनचा तुडवडा जाणवत आहे. मात्र, त्याचा दुसरीकडे असा फायदा झाला आहे, की ज्या कंपन्यांच्या नावामध्ये ‘ऑक्सिजन’ (Oxygen) शब्दाचा उल्लेख आहे, त्या कंपन्यांमधील गुंतवणूक (inestment) अचानक वाढली आहे. गुंतवणूकदार या कंपन्यांमध्ये पैसे लावत आहेत. मात्र, आता त्या कंपन्यांबाबत वेगळीच गोष्ट समोर आली आहे.

Advertisement

ऑक्सिजन तुटवड्याचा परिणाम शेअर बाजारात दिसत आहे. नावामध्ये ‘ऑक्सिजन’ शब्द असणाऱ्या ‘बॉम्बे ऑक्सिजन कंपनी’च्या (Bombay Oxygen Company) शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. कंपनीचा शेअर मार्च महिन्यापर्यंत 10 हजार होता. ‘बीएसई’मध्ये सोमवारी ‘बॉम्बे ऑक्सिजन इन्वेस्टमेंटस लि.’चा (Bombay Oxygen Investment Ltd.) शेअर 24 हजार 574.85 रुपयांपर्यंत पोहोचला. या कंपनीचे शेअर नियंत्रणात असून, त्याच्या लाभाची मर्यादा 5 टक्क्यापर्यंत असेल.

Advertisement

कंपनीकडून 2019 मध्ये उत्पादन बंद
‘बॉम्बे ऑक्सिजन कॉर्पोरेशन’च्या वेबसाईटवर त्या कंपनीची स्थापना 3 ऑक्टोबर १९६० रोजी झाल्याचा उल्लेख आहे. मात्र, 3 ऑक्टोबर 2018 रोजी कंपनींचं नाव बदलून ‘बॉम्बे इन्वेस्टमेंटस’ असे ठेवण्यात आलं. कंपनीनं त्यांचं औद्योगिक वापरासाठीच्या गॅसचं उत्पादन 2019 मध्येच बंद केलं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कंपनीच्या वेबसाईटमध्ये विरोधाभास आहे. कंपनी आता ऑक्सिजनची निर्मिती करत नाही. ऑक्सिजन आणि औद्योगिक गॅस निर्मितीबाबत उल्लेख मात्र दिसतो.

Advertisement

ऑक्सिजनची निर्मिती करत नाहीत
‘बीएसई’मध्ये या कंपनीची नोंदणी नॉन-बँकिंग फायनान्स (Non Banking Finance Company) कंपनी म्हणून आहे. 31 डिसेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीचं उत्पन्न 33.79 कोटी रुपये होते, तर त्यांना 31.69 कोटी रुपये फायदा झाला होता. कंपनीचं बाजारमूल्य 368 कोटी रुपये आहे. या शिवाय लिंडे इंडिया, भगवती ऑक्सिजन, नॅशनल ऑक्सिजन कंपन्यांच्या शेअरमध्येही तेजी आढळली. विशेष म्हणजे, या कंपन्या ऑक्सिजनची निर्मिती करत नाहीत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply