Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक बातमी : एकाच दिवशी ३७६५ रक्तपिशव्यांचे संकलन; २० जिल्ह्यांत डब्लूएमओचा पुढाकार

अहमदनगर :

Advertisement

करोनामुळे सध्या औषधे आणि रक्त हा घटक आणखीनच जास्त महत्वाचा बनला आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने रक्ताची मागणी आणि पुरवठा बाधित होण्याची शक्यता लक्षात घेऊन वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांनी २० जिल्ह्यात महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याद्वारे एकाच दिवशी तब्बल ३ हजार ७६५ रक्तपिशव्यांचे संकलन झाले आहे.

Advertisement

राज्यभरात २० जिल्ह्यातील ३५ ठिकाणी दि. १८ एप्रिल २०२१ रोजी महारक्तदान शिबीर घेण्यात आले. यात युवक-युवतींनी उत्साहाने सहभागी होत रक्तदानाचा हा महायज्ञ पूर्ण केला. अहमदनगर शहरातही रक्तदान शिबीर घेण्यात आले. न्यू आर्टस्, कॉमर्स & सायन्स महाविद्यालयात झालेल्या या शिबिरात 100 रक्तपिशव्या संकलित झाल्या. पर्त्येक व्यक्ती समाजाप्रती काहीतरी देणं लागते. समाजाचे आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या असलेले ऋण फेडण्यासाठी आवश्यकता पडेल त्यावेळी अनेकजण निसंकोचपणे पुढे येतात. नगर शहरातही त्याचभावनेने 100 जणांनी रक्तदान केले आहे. जिल्हा रुग्णालयाच्या ब्लड बँकेने यासाठी सहकार्य केल्याची माहिती प्रवीण अनभुले यांनी दिली. यावेळी पवनकुमार येणारे, अनिकेत आवारे, योगेश वरखडे, चेतन वाळूंजकर यांच्यासह अनेक तरुण-तरुणी उपस्थित होते.

Advertisement

वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन यांनी घेतलेल्या महारक्तदान शिबिरामधील संकलित रक्तपिशव्यांची माहिती अशी :

Advertisement
रक्तदान ठिकाणसंकलित झालेल्या रक्तपिशव्या
पिंपरी-चिंचवड४४९
हडपसर२४०
वाघोली१७५
शिक्रापूर१४५
कात्रज१८५
कोथरूड१५०
अकोला४४
अमरावती४१
लातूर (बोरगाव)९५
रायगड५६
रत्नागिरी४२
औरंगाबाद१०३
जालना५४
परभणी६०
कोल्हापूर३४४
धुळे३५
नांदेड१७
बुलढाणा१६
बीड७२
सांगली२९१
इस्लामपूर (सांगली)१३६
जत६४
सोलापूर३१
अहमदनगर१००
श्रीगोंदा४५
पारनेर५४
शिर्डी७०
संगमनेर४५
शेवगाव८०
मुंबई२०२
सातारा१४३
कोरेगाव (किणी)५१
सावरगाव (बीड)३८
अकलूज३६

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply