Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांनी’ लपवल्या होत्या 2200 रेमडेसिविर; पहा कुठे सापडला आहे ‘हा’ साठा..!

मुंबई :

Advertisement

सध्या राज्यभरात रेमडेसिविर हे औषध राजकीयदृष्ट्या खूपच संवेदनशील बनलेले आहे. मागणी आणि पुरवठा याचा अवमेळ झाल्याने हे औषध म्हणजे सगळ्यांच्या डोकेदुखीचा विषय बनलेले आहे. अशावेळी मुंबईत तब्बल 2200 रेमडेसिविरचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.

Advertisement

मुंबई पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) संयुक्त कारवाईमध्ये हा साठा काल ताब्यात घेण्यात आलेला आहे. मुंबईत काही निर्यातदारांकडे रेमडेसिविरचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंधेरी पूर्वमधील मरोळ भागातील एका औषध कंपनीवर धाड टाकल्यावर 2000 कुप्या तिथे सापडल्या आहेत. तर, आणखी 200 कुप्या न्यू मरीन लाइन्स भागातून अन्य एका निर्यातदाराकडून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Advertisement

यासह कोल्हापुर शहरात या इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या टोळीमधील योगीराज राजकुमार वाघमारे व पराग विजयकुमार पाटील या दोघांना दोघांना 11 इंजेक्शनसह पोलिसांनी अटक केली आहे. तर, परभणी येथेही अशीच कारवाई झालेली आहे. परभणीत कोविड सेंटरमध्ये कामाला असल्याचा गैरफायदा घेत जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमधून सात इंजेक्शन चोरलेल्या दोघांना पकडण्यात आलेले आहे. परभणी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व अौषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत नर्सिंग स्टाफ डेंटल कॉलेज येथील दत्ता शिवाजी भालेराव आणि शासकीय रुग्णालयातील परिचारिका नीता केशव काळे यांना याप्रकरणी ताब्यात घेतलेले आहे.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply