Take a fresh look at your lifestyle.

नाशिकच्या घटनेच्या चौकशीची काँग्रेसची मागणी; तब्बल 22 जणांचा मृत्यू..!

नाशिक :

Advertisement

नाशिक येथे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन टँकरच्या वायूगळतीमुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. काँग्रेस नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावर चौकशी करण्याच्या मागणीचे ट्विट प्रसिद्ध केले आहे.

Advertisement

Sachin Sawant सचिन सावंत on Twitter: “We demand inquiry into the tragedy at Nasik’s Zakir Hussain Hospital. Anyone who is responsible must be brought to books. Hospital is managed by Nasik corporation which is under @BJP4Maharashtra rule. Bjp must take responsibility. Where are Mayor & 3 bjp local MLAs? Absconding?” / Twitter

Advertisement

नाशिक महापालिका सध्या भाजपच्या ताब्यात असल्याने यावर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहेच. दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळ्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे म्हतेल आहे. तर, मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची गळती होऊन काही रुग्ण दगावल्याची बातमी आहे. हे वृत्त अतिशय हृदयद्रावक आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

Advertisement

ANI on Twitter: “Maharashtra | 22 people have died in Nashik oxygen tanker leak incident till now, confirms Nashik DM https://t.co/K0N21BEsHT” / Twitter

Advertisement

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘टँकरच्या वाल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. याचा परिणाम रुग्णालयावर होईल हे निश्चित आहे. परंतु अद्याप आम्हाला अधिक माहिती मिळवायची आहे. पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही एक प्रेस नोट जारी करू. या रुग्णालयात सुमारे 171 रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात आलेले आहेत. अग्निशमन दल या घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अपघाताबद्दल सांगितले की, ही एक दुर्दैवी घटना आहे. आम्ही सविस्तर अहवाल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही चौकशीचे आदेशही दिले आहेत. या अपघातास जो जबाबदार असेल त्याला अजिबात वाचवले जाणार नाही.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply