Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी आंदोलक आक्रमक; आणखी 20 हजार महिला येणार टिकरी बॉर्डरवर..!

दिल्ली :

Advertisement

देशभरात सध्या कोरोनाच्या कहरामुळे एकूणच अनागोंदीची परिस्थिती आहे. केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या सूचना आणि वक्तव्ये करीत आहेत. रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे आणि त्याचवेळी लस, औषधे आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याचे दिसत असल्याने उलटसुलट बातम्या येत आहेत. अशावेळी आता दिल्लीतील शेतकरी आंदोलकांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अजिबात लक्ष न दिल्याने आंदोलक संतापले आहेत. त्यांनी टिकरी बॉर्डरवर तब्बल 20 हजार महिला आणण्याचे नियोजन केले आहे.

Advertisement

पंजाबमध्ये राज्य सरकारने कडक निर्बंध लावलेले असतानाही हजारो शेतकरी बुधवारी टीकारी सीमेवर मोर्चा काढणार आहेत. हे सर्व शेतकरी भारतीय किसान युनियन ((उग्रहन)) यांचे आहेत. सुमारे 1650 खेड्यांमधील 20,000 शेतकरी पंजाबच्या तीन सीमा ओलांडून दिल्लीमध्ये जातील, असे संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. सरचिटणीस सुखदेवसिंग कोकरीकलन यांनी याबाबत म्हटले आहे की, पुरुष शेतकरी अजूनही शेतात व्यस्त असल्याने आता 60 टक्के महिला यामध्ये असतील. हे सर्व बठिंडा-डबवाली, खानौरी-जींद आणि सरदूलगड-फतेहाबाद सीमेवरुन बसेस, व्हॅन आणि ट्रॅक्टरमध्ये बसून टिकरच्या सीमेवर पोहोचतील.

Advertisement

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, खानौरी-जींद सीमेवर संघटनेचे अध्यक्ष जोगिंदरसिंग उग्रहन आणि सरचिटणीस सुखदेवसिंग कोकरीकलन हे स्वतः उपस्थित असतील. उग्रहन यांना मार्चमध्ये कोरोना विषाणूची बाधा झाली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ते कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा सीमेवर आलेले आहेत. सुखदेव सिंग यांच्या हातालाही फ्रॅक्चर झाले होते आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून तेही आता सावरले आहेत.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply