Take a fresh look at your lifestyle.

म्हणून पंतप्रधानांना झाला 1.75 लाखांचा दंड; पार्टी करणे भोवले, पहा कशी झाली कार्यवाही

हेडिंग वाचून गोंधळात पडलाय की काय? काहींना तर भोवळ येण्याची शक्यताही आहे.. कारण, महत्वाच्या व्यक्ती (VIP) म्हणजे नियमांना तिलांजली देण्याचा जन्मसिद्ध हक्क असलेले महाभाग अशीच आपल्या भारतीयांची धारणा आहे. आणि त्यातही महत्वाचे म्हणजे आपणही नियम न पाळणाऱ्यांचेच भक्त किंवा कार्यकर्ते असतो. त्यामुळे वाचून घेऊन जास्त आश्चर्यचकित अजिबात होऊ नका. कारण, ही बातमी आपल्या’ भारतातील अजिबात नाही.

Advertisement

ही बातमी आहे युरोपातल्या नॉर्वे नावाच्या देशातील. तिथल्या पंतप्रधान महोदयांनी बर्थडे पार्टी केली, त्याला 13 लॉक एकत्र आले आणि पोलिसांनी दणक्यात ही कारवाई करून पावणेदोन लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे. आपण आज सहजपणे एक मनोरंजक घटना म्हणून ही वाचूया. कारण, ही बातमी वाचली म्हणजे आपण लगेचच कर्तव्यदक्ष वगैरे काही होणार नाही. ना, आपल्या नेत्यांनाही आपण नियमांचे पालन करण्यासाठीची प्रेरणा देणार आहोत. कारण, सोशिक असणे, आणि शोषक होणे हेच भारतीयांचे प्राक्तन आहे. त्यामुळे पाहूयात हा मनोरंजक किस्सा आणि वाचून विसरून जाऊया व आपल्या नेत्यांच्या चुकांवर बोलणाऱ्यांना शिव्याही नियमितपणे घालूया..

Advertisement

पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी मार्च महिन्यात 60 व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबातील 13 सदस्यांसह दणक्यात पार्टी केली. त्याचे फोटो तर मग व्हायरल होणार ना? त्यात पंतप्रधान म्हटल्यावर कौतुकाने जास्त व्हायरल होणार. अंतर, तिथेच माशी शिंकली. सध्या त्या देशात केवळ 10 लोकांना एकत्र येण्याची परवानगी आहे. तसेच त्या दहाजणांनी अंतराची अटही पाळायची असते. जास्त लॉक एकत्र अये आणि अटी पाळल्या नाहीत म्हणून मग पोलिसांनी पंतप्रधानांना 20 हजार नॉर्वे क्राउन्स म्हणजेच सुमारे 1,75,648 रुपये दंड ठोठावला आहे.

Advertisement

पंतप्रधानांनी माउंटन रिसॉर्टमध्ये पार्टी आयोजित केल्याबद्दल माफी मागितली. मात्र, तिथे सहसा सामान्य माणसांना दंड न करणाऱ्या पोलिसांनी पंतप्रधानांना यातून काही सोडले नाही. सरकारच्या प्रमुखांच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्यामुळे उलट कडक अंमलबजावणी करून तिथे दंड आकारण्यात आला. जेणेकरुन नियम न पाळणाऱ्या सर्वांना कारवाई केली जाईल असा संदेश दिला जाऊ शकेल..!

Advertisement

नॉर्वेच्या पोलिसांचे म्हणणे आहे की, कायदा सर्वांसाठी समान आहे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कारवाई केली जाईल. तथापि, पंतप्रधानांनी ज्या रिसॉर्टमध्ये पार्टी आयोजित केली होती त्यावरही नियम मोडल्याचा आरोप करण्यात आला. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर कोणताही दंड आकारला नाही. सर्व रक्कम पंतप्रधान यांच्याकडून वसूल केली जाणार आहे.

Advertisement

*(ता. क. : ही खोटी बातमी नसून वास्तव आहे. अनेकांना ती पटणार नाही. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मास्क न लावून घेतल्या जाणाऱ्या सभा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या लाखोंच्या सभा घेण्याचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ‘मास्क न लावता, कुठे आहे करोना’ असे वाक्य ऐकण्याचे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचे लटांबर पाहण्याची आपल्याला सवय झालेली आहे. त्यामुळेच ही बातमी काहींना अतिशयोक्ती वाटू शकते. त्या सर्वांची अगोदरच जाहीर माफी मागतो)

Advertisement

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply