Take a fresh look at your lifestyle.

भयंकर बातमी : नाशिकच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती; 22 जणांचा मृत्यू..!

नाशिक :

Advertisement

देशातील कोरोना विषाणूच्या साथीने हैराण झालेल्या नागरिकांना ऑक्सिजन वायूचे महत्व खऱ्या अर्थाने आता समजत आहे. याच प्राणवायूची मागणी असताना पुरवठा त्या प्रमाणात नाही. त्यातच नाशिक येथे डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाबाहेर ऑक्सिजन टँकर फुटल्यामुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

(1) ANI on Twitter: “#WATCH | An Oxygen tanker leaked while tankers were being filled at Dr Zakir Hussain Hospital in Nashik, Maharashtra. Officials are present at the spot, operation to contain the leak is underway. Details awaited. https://t.co/zsxnJscmBp” / Twitter

Advertisement

गळतीमुळे रुग्णालयात 30 मिनिटे ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार अनेक लोकांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळ्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची गळती होऊन काही रुग्ण दगावल्याची बातमी आहे. हे वृत्त अतिशय हृदयद्रावक आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.

Advertisement

या रुग्णालयात सुमारे 171 रुग्णांना ऑक्सिजन बेड देण्यात आलेले आहेत. अग्निशमन दल या घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अपघाताबद्दल सांगितले की, ही एक दुर्दैवी घटना आहे. प्राथमिक माहितीनुसार, 11 जणांच्या मृत्यूबद्दल आम्हाला माहिती मिळाली आहे. आम्ही सविस्तर अहवाल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही चौकशीचे आदेशही दिले आहेत. या अपघातास जो जबाबदार असेल त्याला अजिबात वाचवले जाणार नाही.

Advertisement

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘टँकरच्या वाल्व्हमध्ये बिघाड झाल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन गळती झाली. याचा परिणाम रुग्णालयावर होईल हे निश्चित आहे. परंतु अद्याप आम्हाला अधिक माहिती मिळवायची आहे. पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही एक प्रेस नोट जारी करू.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

(1) Dr.Jitendra Awhad on Twitter: “नाशिकमधील डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरची गळती होऊन काही रुग्ण दगावल्याची बातमी आहे. हे वृत्त अतिशय हृदयद्रावक आहे. या घटनेत दगावलेल्या रुग्णांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply