Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021: मुंबई Vs दिल्ली आज आमने-सामने; पहा हेड टू हेड आणि संभाव्य संघ

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) आज १३ वा सामना दिल्ली कॅपिटल आणि मुंबई इंडियन्स यांच्यात  चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी ७.३० वाजता खेळला जाईल. आतापर्यत या दोन्ही संघात एकूण २८ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी १६ सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने तर १२ सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटलने बाजी मारली आहे.

Advertisement

चेन्नईच्या खेळपट्टीचा अंदाज लावणे सध्या तरी अवघड आहे. पण जो संघ नाणेफेक जिंकतो तो फलंदाजी स्विकारतो अशी इथुन मागची परिस्थीती आहे. त्यामुळे नाणेफेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकेल. या खेळपट्टीवर सध्या १५० धावसंख्या उभारणेही अवघड जाते. १५० च्या आत धावसंख्या उभारुनही शानदार विजय संपादित केल्याचे काही सामन्यांमधून निष्पन्न झाले आहे.

Advertisement

दरम्यान, गतवर्षी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये दोन्ही संघांमधील अंतिम सामना खेळला होता. या सामन्यात मुंबईने ५ गडी राखून विजय मिळवत आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. या सामन्यात दिल्लीने ७ गडी गमावत १५६ धावा केल्या होत्या, त्या प्रत्युत्तरात मुंबईने १८.४ षटकांत ५ विकेट गमावून १५७ धावा करत लक्ष्य गाठले. दिल्ली कॅपिटलने २०१० मध्ये चेपाक येथे मुंबईिवरुध्द अखेरची लढत जिंकली होती. त्यांनी चेन्नई सुपर किंग्जसोबत खेळलेले ६ सामने गमावले आहेत. तर मुंबईच्या बुमराहकडून दिल्लीच्या फलंदाजांना सावध खेळी करावी लागेल. ऋषभ पंतला आतापर्यत बुमराहने ५ वेळा बाद केले आहे.

Advertisement

अपेक्षित प्लेईंग इलेव्हन
दिल्लीची कॅपिटल : शिखर धवन, पृथ्वी शॉ, स्टीव्हन स्मिथ, ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस, ललित यादव, ख्रिस वॉक्स, आर.अश्विन, कॅगिसो रबाडा, आवेश खान, अमित मिश्रा.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, क्विं टन डी कॉक, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, राहुल चहर, ॲडम मिलणे, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बाउल्ट. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply