Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : म्हणून धोनीला ‘तसं’ काही म्हटलेलं अजिबात आवडत नाही..!

मुंबई :
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कोणीही त्याला अनफिट म्हटलेलं आवडत नाही. सोमवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर धोनी म्हणाला की, संघातील युवा खेळाडूंशी फिटनेस स्पर्धा करणे अवघड आहे. परंतु या ३९ वर्षीय खेळाडूच्या फिटनेसबाबत कोणतेही प्रश्न उठवले जात नाहीत, यातच त्याच्या यशाचे गमक आहे.

Advertisement

धोनी म्हणाला की, वाढत्या वयामुळे स्वत:ला पूर्वीप्रमाणे फिट ठेवणे खूप अवघड आहे. गेल्या वर्षीच धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थानविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने राजस्थानला ४५ धावांनी पराभूत केले. सामन्यानंतर बोलताना माही म्हणाली की, जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा कोणी तुम्हाला अनफिट म्हटलं नाही पाहिजे. जेव्हा मी खेळतो, तेव्हा मी स्वत:ला तरूण खेळाडूंपेक्षा फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो.

Advertisement

यासह धोनी म्हणाला, आपण गेममध्ये कशी कामगिरी करतो याची आपल्याला खात्री नसते. मी जेव्हा २४ वर्षांचा होतो तेव्हाही कामगिरीची खात्री नसते आणि आज मी ४० वर्षांचा झालो तरीही तिच परिस्थीती आहे. परंतु सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट आहे ती म्हणजे या वयातही कोणी मला अनफिट म्हणत नाही.राजस्थानविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलताना धोनी म्हणाला की, आमच्या संघाने सामन्यात १८० हून अधिक धावा केल्याचा मला आनंद झाला. परंतु आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू शकलो असतो. गोलंदाजीबद्दल बोलताना सॅमने चांगली गोलंदाजी केली. सर्वात मोठी गोष्ट ही होती की, मैदानावर दव असतानाही चेंडू फिरत होता.

Advertisement

बॉल खूप फिरत होता, त्यात मोईनने ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याचा मला विशेष आनंद आहे. मोईनने ३ षटकांत सात धावा देऊन तीन महत्त्वपूर्ण बळी घेतले. गेल्या वर्षात आणि या वर्षात बरेच बदल होत असल्याचे धोनी म्हणाला. मागील वर्षी पॉईंट्स टेबलमध्ये आम्ही सातव्या क्रमांकावर होतो. यावर्षी आमच्या गोलंदाजांनी आणि संपूर्ण संघाने खेळाच्या सुधारणेसाठी बरेच कष्ट घेतले आहेत. चेन्नईने आतापर्यत खेळलेल्या ३ पैकी दोन सामन्यात विजय मिळवला असून पॉइंट टेबलमध्ये ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply