Take a fresh look at your lifestyle.

IPL 2021 : हार्दिकच्या गोलंदाजीबाबत कोच जयवर्धनेने सांगितली माहिती; पहा काय दुखापत झालीय त्याला..!

मुंबई :
इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या मोसमातील पहिल्या तीन सामन्यात गोलंदाजी न करणारा मुंबईचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याला इंग्लंडविरुध्दच्या एकदिवसीय सामन्यात किरकोळ दुखापत झाल्याचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी सोमवारी सांगितले. श्रीलंकेचा माजी फलंदाज म्हणाला की, या मोसमात आम्ही तो गोलंदाजी करतानाची वाट पाहत आहोत, पण बहुधा इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या वनडे सामन्यात त्याला किरकोळ दुखापत झाली होती, आता तो दुखापतीतून सावरला आहे. हार्दिक लवकरच गोलंदाजी करेल अशी अपेक्षा महेला याने व्यक्त केली.

Advertisement

महेला म्हणाला की, आता हार्दिक संदर्भात कोणतीही जोखीम घ्यायची नाही. तो गोलंदाजी करण्यासाठी पूर्ण फिट आणि तयार असल्यावरच त्याला गोलंदाजी करु दिली जाईल. पुढील काही आठवड्यात तो गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे. तो म्हणाला की, दुखापतीतून तो सावरल्यानंतर त्याला बरे वाटल्यानंतरच तो गोलंदाची करताना दिसेल. आपण मुद्दाम त्याला गोलंदाजी करु देत नाहीत, असे काही नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध डेव्हिड वॉर्नर आणि अब्दुल समद यांना बाद करून संघाला १३ धावांनी विजय मिळवून देण्यात हार्दिकने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

Advertisement

जयवर्धने म्हणाला की, हार्दिकने सीमरेषेजवळ फिल्डिंग करावी अशी आमची इच्छा आहे. कारण त्याचा थ्रो खूप वेगवान आहे आणि तो चांगले झेल पकडतो. पण खांद्याच्या दुखापतीमुळे आपण त्याला ३० यार्डात फिल्डिंगसाठी उतरवत आहोत. आयपीएलच्या सध्याच्या हंगामात चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु जयवर्धने म्हणाला की, येथील खेळपट्टीवर खेळणे अशक्य नाही, परंतु खेळपट्टी जरा स्लो आहे.

Advertisement

आतापर्यंत येथे खेळले गेलेल्या सहा सामन्यांपैकी फक्त तीन वेळाच संघाने १५० हून अधिक धावा केल्या आहेत तर पाच सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. मात्र, रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि केकेआर यांच्यात खेळलेला सामना हाय स्कोरींग होता. विराट कोहलीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना चार विकेट्सवर २०४ धावा देत ३८ धावांनी विजय मिळविला होता. 
संपादन : अपेक्षा दाणी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply